भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापूर्वी पंजाबच्या जनतेसाठी पत्र लिहिले आहे. माजी पंतप्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर त्यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. मनमोहन सिंग यांनी गुरुवारी त्यांच्यावर "द्वेषपूर्ण भाषणे" देऊन सार्वजनिक प्रतिष्ठा आणि पंतप्रधान कार्यालयाचे गांभीर्य कमी केल्याचा आरोप केला आहे.
१ जूनला शेवटच्या टप्प्यातील लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. मनमोहन सिंग यांनी 1 जून रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यापूर्वी पंजाबच्या मतदारांना केलेल्या आवाहनात अनेक गोष्टींवर खुलेपणाने लिहिले आहे. केवळ काँग्रेसच विकास आणि प्रगतीशील भविष्य सुनिश्चित करू शकते, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. काँग्रेसची सत्ता आल्यावरच लोकशाही आणि संविधानाचे रक्षण होईल. पुढे मनमोहन सिंग यांनी पत्रात म्हटले आहे की, अमानवीकरणाची ही कहाणी आता शिगेला पोहोचली आहे. आता आपल्या प्रिय देशाला या बेताल शक्तींपासून वाचवणे हे आपले कर्तव्य आहे.
वरिष्ठ काँग्रेस नेते मनमोहन सिंह यांनी सशस्त्र दलांवर ‘चुकीच्या विचारांची’ अग्निवीर योजना लादल्याबद्दल भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. पंजाबच्या मतदारांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, भाजपला वाटते की देशभक्ती, शौर्य आणि सेवा केवळ चार वर्षांची आहे. यावरून त्यांचा खोटा राष्ट्रवाद दिसून येतो. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनीही निवडणूक प्रचारादरम्यान अग्निवीर योजनेवर प्रश्न उपस्थित केले असून ती रद्द करावी, असे म्हटले आहे.
मोदींवर हल्लाबोल करत माजी पंतप्रधानांनी म्हटं आहे की, या लोकसभा निवडणुकींच्या दरम्यान मी होणाऱ्या प्रत्येक राजकीय चर्चेवर लक्ष ठेवून आहे. मोदीजी अत्यंत द्वेषपूर्ण भाषणे करत आहेत, ही भाषणे पूर्णपणे फूट पाडणारी आहेत. मोदीजी हे पहिले पंतप्रधान आहेत ज्यांनी केवळ सार्वजनिक प्रतिष्ठाच कमी केली नाही तर पंतप्रधान कार्यालयाचे गांभीर्यही कमी केले आहे. यापूर्वी कोणत्याही पंतप्रधानाने असे घृणास्पद, असंसदीय आणि असभ्य शब्द वापरलेले नाहीत.
मोदींच्या भाषणांचा उद्देश समाजातील विशिष्ट वर्गाला किंवा विरोधकांना टार्गेट करण्याचा होता. काही खोट्या विधानांसाठी त्यांनी मला जबाबदार धरले आहे. मी माझ्या आयुष्यात असे कधीच बोललो नाही. हा भाजपचा एकमेव कॉपीराइट आहे. पंतप्रधान मोदींनी मनमोहन सिंग यांच्यावर आरोप केला होता की, त्यांनी देशातील साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला अधिकार दिला आहे. सिंग म्हणाले की, भारतातील जनता हे सर्व पाहत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.