चंडीगड - हरियानामध्ये आजपासून भाजप आणि जननायक जनता पक्षाचे (जेजेपी) नवे "युती'पर्व सुरू झाले, मनोहरलाल खट्टर यांनी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली; तर "जेजेपी'चे सर्वेसर्वा दुष्यंत चौताला यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल सत्यदेव नारायण आर्या यांनी दोन्ही नेत्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
राजभवनात झालेल्या या सोहळ्यास भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, पंजाबचे राज्यपाल व्ही.पी. सिंह बदनोर, पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, केंद्रीय मंत्री कृष्णपाल गुर्जर, आर. एल. कटारिया, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, हरियानाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीरसिंग बादल आदी मंडळी उपस्थित होती. तत्पूर्वी राज्यात सरकार स्थापनेसाठी भाजप आणि "जेजेपी'ने एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यात वेगळे राजकीय समीकरण आकाराला आले होते. राज्यातील अपक्ष आमदारांनीही भाजपलाच पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने खट्टर यांचे आसन मजबूत झाले होते.
हरियानाच्या जनतेने दिलेल्या भाजपविरोधी कौलाचा दुष्यंत चौताला यांनी अवमान केला असून, ते आता भाजपच्या वळचणीला जाऊन बसले आहेत. सत्ताधारी पक्षाची भूमिका काहीही असो; राज्याच्या विकासासाठी त्यांनी काम करावे, एवढीच आमची अपेक्षा आहे. भावी वाटचालीसाठी त्यांना आमच्या शुभेच्छा.
- भूपिंदरसिंह हुडा, नेते कॉंग्रेस
दुष्यंत यांचे कुटुंबीय उपस्थित
आजच्या शपथविधी समारंभाला दुष्यंत चौताला यांचे सारे कुटुंबीय उपस्थित होते, दुष्यंत यांचे पिता अजय चौताला, माता आणि विद्यमान आमदार नैना चौताला, पत्नी मेघा, बंधू दिग्जिवय ही मंडळी आवर्जून उपस्थित होती. सध्या फर्लो रजेवर तुरुंगाबाहेर आलेल्या अजय चौताला यांनी मुलाच्या कर्तबगारीवर आनंद व्यक्त करताना, ही आघाडी नक्कीच राज्याच्या विकासासाठी काम करेल, असा विश्वास व्यक्त केला. त्यांच्या पत्नी मेघा चौताला यांनीही हेच मत मांडले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.