Maratha Reservation: राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे पाटील गेल्या आठ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. जरांगे पाटील यांनी राज्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे. मात्र राज्य सरकारने ज्यांच्या कुणबी नोंदी आढळल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यातून मोठी माहिती समोर आली आहे.
पुणे जिल्ह्यात मागील पावणेदोन वर्षांत सुमारे १२ हजार २९४ जणांना कुणबी प्रमाण पात्रांचे वाटप करण्यात आले आहेत. पुणे जिल्हा प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली आहे. जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्रासाठी १ जानेवारी २०२२ ते ३१ ऑक्टोबर २०२३ या काळात सुमारे १२ हजार ९११ अर्ज करण्यात आले होते. यामध्ये महसुली पुरावे तपासून त्यातील १२ हजार २९४ जणांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले आहेत.
एकूण अर्जांच्या तुलनेत प्रमाणपत्र वाटपाचे प्रमाण ९६ टक्के आहे. उर्वरित ४६० अर्ज प्रलंबित असून अर्जदारांनी वंशावळ पुरावे सादर केल्यानंतर त्यावर कार्यवाही करावी, असे आदेश संबंधित प्रांताधिकारी व तहसीलदार यांना दिले आहेत.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीबाबत राजकीय वातावरण तापले आहे. २०२४ च्या निवडणुकीला फक्त ६ महिने उरले आहेत. अशा स्थितीत महाराष्ट्रात उठलेली मराठा आरक्षणाची मागणी भाजपसाठी आव्हानात्मक बनली आहे.
मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला मदत करण्यासाठी कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची रणनीती आखली आहे. शिंदे समितीने शोधलेल्या पुराव्यांच्या आधारे ११५३० जुनी कागदपत्रे सापडली असून, त्यात कुणबी जातीचा उल्लेख आहे.
या संदर्भातील नवीन प्रमाणपत्रे मंगळवारी देण्यात येणार आहेत. ज्यांच्याकडे कुणबी जातीचा पुरावा असेल त्यांना ओबीसी प्रमाणपत्र तत्काळ देता येईल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहेत. मात्र मनोज जरांगे पाटील त्यांच्या मागणीवर ठाम आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.