आज जे सत्तेत आहेत त्यांच्याकडे देशाचा विचार करण्याची ताकद नाही. पंतप्रधान सुरतमध्ये हिरे व्यवसायाचे उद्घाटन करणार आहेत. पूर्वी मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये हिऱ्यांचा व्यापार व्हायचा, आता तो येथून हलवण्यात आला आहे. या बाजारामुळे लाखो लोकांना रोजगार मिळाला. सुरतला जाणाऱ्या हिऱ्यांच्या व्यापारामुळे स्थानिकांना रोजगार गमवावा लागणार आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
मुंबईतल्या बीकेसी परिसरामध्ये सीआयएसएफच्या जवानाने स्वतःवर गोळी झाडत जीवन संपवलं आहे.
मध्य प्रदेशात काँग्रेसने एक मोठं पाऊल उचललं आहे. कमलनाथ यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवून त्यांच्याजागी जीतू पटवारी यांची नेमणूक केलीय.
मनोज जरांगे पाटलांनी १७ तारखेचा अल्टिमेटम दिल्याने सरकारला जाग आल्याचं दिसून येत आहे. सरकारचं एक शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीसाठी रुग्णालयात दाखल झालं आहे.
उद्धव ठाकरे हे दुटप्पी भूमिका घेत आहेत. त्यांना गौतम अदानी आणि शरद पवार यांचे संबंध माहिती नाहीत का? असा प्रश्न भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला. ठाकरेंना टीडीआर आणि एफएसआयचे हिशोब चांगले कळतात, असंही दरेकर म्हणाले.
मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे यांनी ठेवलेल्या मागण्यांचा सरकारनं गांभीर्यानं विचार करावा. सरकारनं त्यांना जो शब्द दिला आहे, तो पाळावा अन्यथा आपण स्वतः जरांगेंसोबत मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी होऊ असा इशारा प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे.
ठाण्यात एका तरुणीला कारखाली चिरडून जीवेमारण्याचा प्रयत्न झाला होता. यामध्ये संबंधित तरुणीच्या पायाला गंभीर इजा झाली आहे. या तरुणीनं आज आपल्यावर झालेली आपबिती सांगितली आहे.
धारावीचा टीडीआर घोटाळा हा जगातला सर्वात मोठा टीडीआर घोटाळा आहे. आमची चौकशी करण्याआधी स्वतःचा सुटलेला पायजमा वर घ्या, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीकास्त्र सोडलं.
या धारावीत पोलिसांना, गिरणी कामगारांना, सफाई कर्मचाऱ्यांना घरं द्या. मी विकासाच्या विरोधात नाही. पण हा विकास योग्य पद्धतीनं झाला पाहिजे. मुंबईला चिरडून टाकायचं आणि सर्वकाही गुजरातला न्यायचं, हा डाव आहे. गुजरातला पळवलेलं आर्थिक केंद्र आहे असं माझ्या धारावीत पाहिजे. हा माझ्या धारावीचा प्लॅन आहे.
भाजपच्या जावयाला अदानीला आंदण देण्यासाठी ही मुंबई महाराष्ट्राला दिलेली नाही. मुंबई संपवण्याचा हा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. कोस्टल रोडला आम्ही टोल लावणार नव्हतो पण यांनी टोल लावणार आहेत. पोलिसांना सांगतो की सरकार येतं आणि जातं तुम्ही तुमचं रेकॉर्ड खराब करु नका. काही निवृत्त पोलिसांचे गुंड इथं सोडले आहेत, त्यांची गुंडगिरी ठेचून काढा.
धारावीतील लोकांना ५०० फुटांचं घर मिळालं पाहिजे, अशी आग्रही मागणी यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली.
भाजपवाले धारावीबरोबर देवनार आणि अभ्युदय नगरही अदानीच्या घशात घालायला निघाले आहेत. देवनारची तीनशे साडेतीनशे एकर जागा हडपण्याची योजना त्यांनी आखली आहे. वेळ आली तर पापडासारखं वाळत घालू, असंही ते म्हणाले.
२०१८-१९ मध्ये धारावीबाबत जीआर निघाला. म्हणजे त्यावेळी आमचं सरकार नव्हतं तर त्यांचंच सरकार होतं. त्यामुळं याबाबत कोणी पाप केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीसांचं आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला.
उद्धव ठाकरेंचं सरकार बिल्डरधार्जिंनं असल्याचा आरोप केला जातो पण माझा एकतरी निर्णय असा दाखवा. अडीच वर्षात माझं सरकार असताना मी धारावीवर एकतरी निर्णय घेतला आहे का? सांगा.
उद्धव ठाकरे - सरकारच्या नेत्यांना पन्नास खोके कमी पडायाल लागलेत म्हणून धारावी गिळायला निघाले आहेत. सब भूमी गोपाल की तशी सब भूमी अदानीकी होऊ देणार नाही. भारतीय जुगार पार्टी अदानींची बाजू मांडत आहे, असा आरोपही त्यांनी भाजपवर केला.
एका बाजूला राज्य शासन धारावीचा पुनर्विकास करण्याचा प्रयत्न आहे तर दुसरीकडे विरोधक याला विरोध करत आहेत. मात्र, धारावीतील स्थानिक रहिवाशांनी याबाबत आम्हाला या विकासाबाबत विश्वासात घेतलेलं नाही असा आरोप केला आहे.
धारावीचा विकास करा मात्र आम्हाला इथेच राहू द्या, असंही काहींनी म्हटलं आहे. आजवर कित्येकदा धारावीचा विकास होणार हे ऐकलंय मात्र प्रत्यक्षात तो झालेला नाही असंही स्थानिक रहिवासी म्हणत आहेत.
शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली धारावी ते बीकेसीतील अदानी कार्यालय असा धारावी बचाव मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा बीकेसीत पोहोचला असून सध्या शिवसेनेच्या नेत्यांची भाषण सुरु आहेत. थोड्याच वेलात इथं उद्धव ठाकरे जनतेला संबोधित करणार आहेत.
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली धारावी बचाव मोर्चाला सुरुवात झाली आहे. यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसह डावे पक्ष अशा १४ पक्षांनी सहभाग घेतला आहे. धारावीतून सुरु झालेला हा मोर्चा बीकेसीत आदानींच्या कार्यालयापर्यंत जाणार आहे.
मुंबईतील धारावी बचाव आंदोलनात उद्धव ठाकरे सहभागी झाले असून या मोर्चामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्या आंदोलनात संजय राऊत, अरविंद सावंत सहभागी झाले आहेत.
ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर घणाघाती आरोप केला आहे. ज्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु झाली आहे.
आरक्षण होईपर्यंत कोणतीही राजकीय सभा होऊ देणार नाही. अशी भूमिका घेत मराठा आंदोलकांनी ठाकरे गटाची बैठक उधळल्याची बाब समोर आली आहे.
वर्ध्यामध्ये ओबीसींचा महाएल्गार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्याला मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहणार असल्याची माहिती होती. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी त्याला न जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
राष्ट्रीय जल अकादमी (एनडब्ल्यूए) जवळ भरधाव डंपरने एका कारला चिरडले. या अपघातात एका लहान बाळासह तिघेजण जखमी झाल्याचे वृत्त आहे. अपघाताची तीव्रता एवढी होती की यात कारचा अक्षरशः चुराडा झाला, सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. हवेली पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. डंपर चालकाला हवेली पोलीसांनी ताब्यात घेतले असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
तुम्ही राज्याच्या हिताची भूमिका घेताय कि संपूर्ण मुंबई अदानीकडे गहाण ठेवतात याचा खुलासा आधी करा अशा शब्दात विनायक राऊतांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
प्रसिद्धी मिळाल्याने जरांगे पाटील यांच्या डोक्यात हवा गेली अशा शब्दात समीर भूजबळांनी जंरागे पाटलांवर टीका केली आहे. भुजबळांना धमक्या देण्याचे सत्र सुरुच असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
दिल्लीत होणाऱ्या INDIA आघाडीच्या बैठकीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अनुपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ५ राज्यांच्या निवडणुकी दरम्यान आप आणि कॉंग्रेस पक्षामध्ये खटके उडाले होते. त्यामुळे, या बैठकीत ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची चर्चा होऊन पुढील रणनिती ठरवण्यावर चर्चा होणार होती. मात्र, अरविंद केजरीवाल ९ ते २७ डिसेंबर दरम्यान विपश्यनेसाठी जाणार आहेत.
मराठा आरक्षणावरून भाजपला टार्गेट केलं जात आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात भाजपच्या बैठकीत बोलताना केले आहे. नागपुरात आज भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते. या भाजपच्या बैठकीत बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे.
ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीला बंदी घालणे हा मूर्खपणाचा निर्णय होता, पण उशिरा का होईना सरकारने हा निर्णय अंशता: मागे घेतला आहे, त्याचं मी स्वागत करतो, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात म्हटले आहे.
देशाला कोण विकसित करु शकत असेल तर ते मोदीजी करु शकतात. राहुल गांधीनी या सर्व राज्यात जाऊन सात गॅरंटी दिल्या होत्या पण त्या गँरंट्या लोकांनी नाकारल्या आणि एकच गँरंटी परिपूर्ण आहे ती म्हणजे मोदीजी, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात भाजपच्या बैठकीत बोलताना केले.
कर्जत खालापूर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. चंदशेखर बावनकुळे तसेच देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश सोहळा पार पडला.
"सर्वांना माहिती आहे की धीरज साहू हे गांधी कुटुंबाचे एटीएम होते. हा पैसा आला कुठून हा खरा प्रश्न आहे. ते गांधी कुटुंबीयांसोबत फोटो क्लिक करुन लोकांवर दबाव आणत होते, हे सर्वांना माहिती झालं आहे." असं मत केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केलं आहे.
मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरिवली स्थानकात दारुड्याकडून एका प्रवासी महिलेचा विनयभंग करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा दारुडा महिलेला शिवीगाळ करून मारहाण आणि धमकावण्याचा प्रयत्न करत असताना या ठिकाणी अनेक प्रवासी देखील उपस्थित होते. मात्र महिलेला वाचवण्यासाठी कोणीही प्रवासी पुढे आला नाही. अशावेळी जागृत मनसे कार्यकर्त्यांकडून दारुड्यास मारहाण करण्यात आली. या कार्यकर्त्यांनी दारुड्याला त्या महिलेची माफी देखील मागण्यास भाग पाडले.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि खासदार राहुल गांधी यांनी नव्यानेच स्थापन झालेल्या पॉलिटिकल अफेअर्स कमिटीची बैठक घेतली. गुजरात काँग्रेसने ही समिती स्थापन केली आहे. AICC मुख्यालयात ही बैठक पार पडली.
परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ओमानच्या राष्ट्रप्रमुखांसह वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांचे उच्चस्तरीय शिष्टमंडळही भारताला भेट देणार आहे.
"हा मोर्चा शिवसेनेचा आहॆ, हा मोर्चा फक्त धारावी वाचवण्यासाठी नाही तर पुनरविकासाच्या नावाखाली TDR घोटाळा आहे. गुजराती लॉबी यामागे मोठी आहे धारावीतील गरीब लोकांना घर मिळायला हवी. ते जिथे राहतात तिथे त्यांना व्यवसायासाठी जागा मिळायला हवी." असे संजय राऊत म्हणाले.
उद्धव ठाकरे हे चांगल्या प्रकल्पांना विरोध करत असल्याचं टीझर मधून दाखवण्यात आलं आहे. मुंबई मेट्रो, आरे कारशेड, समृध्दी महामार्ग आणि आता धारावी पुनर्विकास प्रकल्पाला ते विरोध करत आहेत. विकासाला विरोध हीच उद्धव ठाकरे यांची भूमिका असल्याचं टीझर मधून दाखवण्यात आले आहे.
पैशाचा पाऊस पाडतो म्हणून एकाची १८ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाला व त्याच्या सहकार्याला हडपसर पोलिसांनी अखेर अटक केली आहे. दोन आरोपींना न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. इतर चार फरार आरोपींचा हडपसर पोलीस शोध घेत आहेत.
राज्य विधान परिषदेने लोकायुक्त विधेयक मंजूर केल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. य़ावेळी अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांचे फोनवरू आभार देखील मानले.
मध्य प्रदेशात इंदूरच्या शक्कर बाजारातील खाद्यपदार्थांच्या दुकानात आणि मिठाईच्या दुकानाला काल रात्री भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.