File photo of Narendra Modi 
देश

व्यापाऱ्यांची लाल फितीतून सुटका : नरेंद्र मोदी

सकाळन्यूजनेटवर्क

द्वारका (गुजरात) : वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) रचनेत केंद्र सरकारकडून काल महत्त्वपूर्ण बदल करण्यात आल्यामुळे देशातील जनतेसाठी दिवाळीचे लवकर आगमन झाले आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केला. जीएसटीने व्यापाऱ्यांची लाल फितीच्या कटकटीतून सुटका होणार असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले. 

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शनिवारी ओखा ते द्वारका बेटादरम्यान होणाऱ्या पुलाच्या कामाचे भूमिपूजन झाले. त्यानंतर आयोजित जाहीर सभेत बोलताना मोदींनी जीएसटी कायद्यात करण्यात आलेल्या बदलांचा दाखला दिला आणि सांगितले, की आज देशातील अनेक वृत्तपत्रांच्या मथळ्यात देशात 15 दिवस आधीच दिवाळीचे आगमन झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे देशातील लोक आनंदित झाले आहेत. 

जीएसटी लागू झाल्यानंतर तीन महिने त्याचा अभ्यास करू, असे आम्ही आधीच म्हटले होते. जिथे कुठे उणीव असेल, तक्रार असेल, व्यवहारात कुठे कमतरता असेल किंवा काही त्रुटी असतील, तर त्यात सुधारणा केली जाईल. देशातील व्यावसायिकांना फाइल आणि सरकारी बाबूंची कटकट निर्माण होऊ नये, असे आम्हाला वाटते. त्यामुळेच ही नवी पद्धत लागू करण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. 

देशातील लोक सरकारच्या निर्णयांना पाठिंबा देत असल्याचा दावाही मोदी यांनी केला. जेव्हा लोकांचा सरकारवर विश्वास असतो आणि चांगल्या हेतूने एखादा निर्णय घेतला जातो, तेव्हा लोकांनी त्याला पाठिंबा देणे नैसर्गिक आहे. सध्या देशातील सामान्य जनतेला विकासाचा फायदा त्यांच्यापर्यंत पोचावा, असे वाटते. कोणालाही त्यांच्या मुलांनी गरिबीत आयुष्य काढावे, असे वाटत नाही. त्यामुळे अशा लोकांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना गरिबीशी लढा देण्यासाठी सरकार मदत करेल, असे आश्‍वासन त्यांनी दिले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आले आहेत. आज द्वारकाधीश मंदिरात पूजा केल्यानंतर ओखा आणि द्वारकाला जोडणाऱ्या पुलाचे मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. 

लहान शहरांतही हवाई वाहतूक 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राजकोट येथील प्रस्तावित ग्रीन फिल्ड विमानतळाचेही भूमिपूजन झाले. स्वातंत्र्यानंतर हवाई क्षेत्रासाठी कोणतेही धोरण नव्हते. आमच्या सरकारने हे धोरण बनवले आणि लहान शहरांनाही हवाई वाहतुकीशी जोडले, असा दावाही त्यांनी या वेळी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT