Allahabadd High Court on Child Adoption e sakal
देश

मूल दत्तक घेण्यासाठी विवाह प्रमाणपत्र आवश्यक नाही : High Court

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : मूल दत्तक घेण्यासाठी विवाह प्रमाणपत्र (Marriage Certificat) ही अत्यावश्यक अट नाही, असा महत्वपूर्ण निर्वाळा अलाहाबाद उच्च न्यायालयाने (Allahabadd High Court) दिला आहे. रिना किन्नर या ट्रान्सजेंडर व्यक्तीने आणि तिच्या जोडीदाराने दाखल केलेल्या रिट याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले आहे.

याचिकेत म्हटले आहे की, रीनाचा जन्म 1983 मध्ये झाला. त्यानंतर त्यांचा विवाह 16 डिसेंबर 2000 रोजी वाराणसी येथील अर्दली बाजार येथील महाबीर मंदिरात झाला. त्यांना एक मूल दत्तक घ्यायचे होते. पण, त्यांना लग्नाचे प्रमाणपत्र मागितले. पण, ते त्यांच्याकडे नव्हते. त्यामुळे त्यांना मूल दत्तक घेता आले नाही. त्यानंतर रिना आणि त्यांच्या जोडीदाराने अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली.

रिना यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. यावेळी मूल दत्तक घेण्यासाठी विवाह प्रमाणपत्र ही अत्यावश्यक अट नाही, असं महत्वपूर्ण निरीक्षण अलाहाबाद उच्च न्यायालयानं नोंदवलं. तसेच हिंदू दत्तक आणि देखभाल कायदा, 1956 अंतर्गत एकल पालक देखील मूल दत्तक घेऊ शकतात, असंही न्यायालयानं यावेळी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मालेगावमतदार संघात शिवसेनेचे उमेदवार दादा भुसे १ लाख ६ हजार ००६ मतांनी विजयी

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT