rajya sabha  
देश

CCTVनुसार मार्शल्सनी गैरवर्तन केलेलं नाही - राज्यसभा अधिकारी

काँग्रेसच्या महिला खासदारांनी मार्शल्सनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : राज्यसभेत काल विरोधी पक्षांचे खासदार आणि मार्शल्ससोबत मोठी खडागंजी झाली होती. यावेळी मार्शल्सनी महिला खासदारांसोबत गैरवर्तणूक केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. याविरोधात आज शिवसेना काँग्रेससह इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी संसदेबाहेर निषेध आंदोलनही केले. पण मार्शल्सनी कोणतंही गैरवर्तण केलेलं नाही, असा दावा वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. राज्यसभा अधिकाऱ्यांच्या हवाल्याने टाइम्सनाऊ न्यूजने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

राज्यसभा अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, "व्हिडिओमध्ये काही खासदार मार्शल्ससोबत भांडण करताना दिसत आहेत. तसेच ते वेलवर आणि टेबलावर चढताना दिसत आहेत. या अधिकाऱ्यांनी निवेदनात म्हटलं की, सुरक्षा रक्षकांनी कुठल्याही खासदारासोबत गैरवर्तन केलेलं नाही, ते फक्त त्यांचं काम करत होते. उलट खासदारचं मार्शल्सना धक्काबुक्की करत होते."

या गोंधळामध्ये एका महिला सुरक्षा रक्षकाला ढकलल्यानं ती जमिनीवर पडली. यामध्ये तिच्या शरिरावर अनेक ठिकाणी मार लागला आहे. दुसऱ्या एका मार्शलला खासदारांनी निशाणा बनवल्यानंतर त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता, असंही राज्यसभेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. या सर्व गोंधळानंतर बुधवारी सरकारनं पावसाळी अधिवेशन गुंडाळलं.

वीमा कंपन्यांचं खासगीकरणाबाबतच्या 'वीमा सुधारणा विधेयक' राज्यसभेत आल्यानंतर विरोधी खासदारांनी त्याला जोरदार विरोध केला होता. दरम्यान, काँग्रेसच्या महिला सदस्या छाया वर्मा आणि फुलो देवी नेताम यांनी आरोप केला होता की, अध्यक्षांच्या आसनाजवळ जाऊन सरकारला विरोध करत होत्या तेव्हा पुरुष मार्शल्सनी त्यांच्यासोबत धक्काबुक्की केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Visits Pune: डोनाल्ड ट्रम्प सुद्धा आहेत पुणेकर! जेव्हा फ्लॅट बघण्यासाठी आले अन् उभं केलं ट्रम्प टॉवर

Latest Marathi News Updates live : 'संविधान नसतं तर निवडणूक आयोगच नसतं' - राहूल गांधी

Donald Trump निवडून आले अन् नेटकऱ्यांनी विजयाचे क्रेडिट Elon Musk यांना दिले, सोशल मीडिया सुसाट.. भन्नाट मिम्स व्हायरल

ICC Test Rankings: मुंबईत बेक्कार हरले अन् कसोटी क्रमवारीत घसरले; विराट, रोहित तर टॉप २० मधून बाहेर फेकले गेले, Rishabh Pant...

PM Modi in Nashik : पंतप्रधानांच्या सभेसाठी शहर पोलिस सतर्क; आयुक्तालयातील बैठकीत कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन

SCROLL FOR NEXT