Mass atrocities of a woman who went out to search for a girl Mass atrocities of a woman who went out to search for a girl
देश

मुलीचा शोध घेण्यासाठी निघालेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार; तिघांना अटक

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : दिल्लीतील पंजाबी बाग परिसरात महिलेवर सामूहिक बलात्कार (Mass atrocities) झाल्याची घटना समोर आली आहे. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी चार तासांत तीन आरोपींना अटक केली, तर एक आरोपी फरार आहे. ही महिला मुलीचा शोध घेण्यासाठी रात्री घराबाहेर पडली होती. मुलगी रात्री कुणाला काहीही न सांगता घराबाहेर गेली होती. यावेळी चार जणांनी मदतीच्या बहाण्याने तिला मादीपूरला नेले आणि सामूहिक बलात्कार केला. (Mass atrocities of a woman who went out to search for a girl)

प्राप्त माहितीनुसार, ३६ वर्षीय महिला मूळची नेपाळची आहे. ती पती आणि मुलांसह पंजाबी बाग भागात राहते. गुरुवारी रात्री महिलेची अल्पवयीन मुलगी काहीही न सांगता कुठेतरी निघून गेली. यामुळे आई तिला शोधण्यासाठी बाहेर पडली. यावेळी महिलेला चार युवकांनी मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्यावर विश्वास ठेवला असता युवक महिलेला मादीपूर येथील एका रेस्टॉरंटच्या बाहेर असलेल्या घरात नेले. तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार (Mass atrocities) केला.

आरोपींनी हरवलेल्या मुलीचा शोध घेण्यास मदत करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे महिलेने त्यांच्यावर विश्वास ठेवला व सोबत गेली. युवकांनी महिलेला मादीपूर येथील रिकाम्या घरात नेले व मारहाण केली. त्यानंतर एक एक करून सर्वांनी सामूहिक बलात्कार (Mass atrocities) केला, असे महिलेने पोलिसांना सांगितले. या घटनेनंतर महिला हादरली असून, पोलिस समुपदेशन करीत आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक (arrested) केली आहे. तर एक आरोपी अद्यापही फरार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT