Mayawati Akash Anand Chandrashekhar azad  sakal
देश

Mayawati Successor: मायावतींनी भाच्याला संधी देण्यामागे 'चंद्रशेखर आझाद' फॅक्टर? वाचा पुनरागमनाची इनसाईड स्टोरी!

सकाळ वृत्तसेवा

Bahujan Samaj Party: बहुजन समाज पार्टी म्हणजेच बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी मोठी राजकीय खेळी खेळली आहे.यावेळी त्यांनी आकाश आनंद यांना पुन्हा एकदा आपला उत्तराधिकारी नेमले आहे. आकाश आनंद यांना राष्ट्रीय समन्वयक पदही परत करण्यात आले आहे

विशेष म्हणजे गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच त्यांनी पुतण्या आनंदकडून हे पद काढले होते. मात्र मायावती यांनी असे का केले? हा प्रश्न महत्वाचा आहे.यामुळे या विषयी काही कयास बांधले जात आहेत.

नगीना लोकसभा

उत्तर प्रदेशातील नगीना लोकसभा मतदारसंघातून चंद्रशेखर आझाद यांचा विजय हे या निर्णयामागे एक कारण असू शकते, असा अंदाज बांधला जात आहे. कारण चंद्रशेखर आझाद बहुजन चळवळीचा पर्याय म्हणून उदयास येत आहेत.मात्र याची आधिकृत घोषणा किव्वा प्रतिक्रिया पक्षाने दिलेली नाही.

समाजवादी पक्ष आणि काँग्रेसला पाठिंबा

डिसेंबरमध्येच मायावती यांनी आपल्या पुतण्याला पदावरुन हटवले होते.यामुळे आनंद लोकसभेच्या प्रचारातून बाहेरच होते.याचा फटका बहुजन समाज पार्टी म्हणजेच बसपाला लोकसभेत बसला असे म्हटले जाते. कारण जर आनंद यांनी प्रचार सुरू ठेवला असता, तर बसपचे मूळ मतदार मानल्या जाणाऱ्या दलित आणि मुस्लिमांच्या एका वर्गाने समाजवादी पक्ष आणि काँग्रेसला पाठिंबा दिला नसता असे म्हटले जात आहे.

भाजपचा दबाव

आनंद यांना पदावरुन काढल्याने मायावतींवर भाजपचा दबाव असल्याची चर्चा लोकसभेत होती. असा संदेशच लोकांना मिळाला होता. मात्र आनंद यांच्या एंट्रीमुळे भाजपची बी टीम असल्याच्या टॅगपासून मुक्त होण्यास बसपाला मदत होईल.असे म्हटले जात आहे. याच बरोबर लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर निराश झालेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा उत्साह मिळेल.

चंद्रशेखर आझाद फॅक्टर

आता लोकसभेत बसपाचा एकही खासदार नाही आणि आझाद देशभर फिरून दलित आणि मुस्लिमांचा मुद्दा सभागृहात मांडतील.याची चंद्रशेखर आझाद यांना दलित नेता आणि मायावतींचा पर्याय म्हणून उदयास येण्यास मदत होईल आणि बसपा कमकुवत होईल.या डॅमेज कंट्रोलसाठी आनंदचे पुनरागमन आवश्यक होते.असेही म्हटले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India ला मोठा धक्का! Shivam Dube टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' खेळाडूला मिळाली संधी

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

Jammu Kashmir Exit Poll Result: हरियाणानंतर जम्मू-काश्मीरमध्येही भाजपला धक्का; काय सांगतो एक्झिट पोलचा अंदाज? वाचा सविस्तर...

IND vs BAN: टीम इंडियाचं ठरलं! अभिषेक शर्मा, संजू सॅमसन ओपनिंग करणार

मेट्रोच्या Aarey To BKC Aqua Line भुयारी सेवेला आजपासून सुरूवात, कसं असेल भाडं आणि वेळापत्रक, जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT