Mayawati on President Election e sakal
देश

''मी देशाची पंतप्रधान होऊ शकते, पण...'', मायावतींनी व्यक्त केली इच्छा

सकाळ डिजिटल टीम

लखनौ : बहुजन समाज पक्षाच्या (BSP) च्या नेत्यांनी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) यांची भेट घेतली. त्यानंतर बसपाच्या सुप्रिमो मायावती (Mayawati) यांनी पत्रकार परिषद घेत समाजवादी पक्षावर (Samajwadi party) जोरदार निशाणा साधला. तसेच त्यांनी पंतप्रधान पदाबाबतची इच्छा देखील बोलून दाखवली.

बहुजन समाज पक्षाचे (BSP) सरचिटणीस सतीश मिश्रा आणि बसपाचे एकमेव आमदार उमाशंकर सिंह यांनी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषद मायावती म्हणाल्या, उत्तर प्रदेश निवडणुकीला हिंदू-मुस्लिम रंग देण्यासाठी भाजप-सपा यांची मिलीभगत आहे. भाजपच्या सत्तेत पुनरागमनाची जबाबदारी समाजवादी पक्ष आणि त्यांच्या प्रमुखांवर आहे. सपा लोकांची दिशाभूल करत आहे की मी राष्ट्रपती होणार आहे. मला हे स्पष्ट करायचे आहे की, मी उत्तर प्रदेशची मुख्यमंत्री आणि देशाची पंतप्रधान होऊनच देशाची सेवा करू शकते. पण राष्ट्रपती होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मुस्लिमांनी बसपाला मतदान केले तर मी मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होऊ शकते. बसपा सरकारच्या काळात बांधलेल्या स्मारकांची सपा सरकार आणि भाजप सरकारकडून देखभाल केली जात नाही. बसपाचे शिष्टमंडळ सतीश मिश्रा आणि उमाशंकर सिंह यांनी यासंदर्भात माझे पत्र घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. सपाकडून खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा हेतू केवळ स्मारकांबाबत होता, असं मायावती म्हणाल्या.

रमजानच्या महिन्यात वीज तोडणे योग्य नाही आणि सरकारने याबाबत काहीतरी केले पाहिजे. मुस्लिम आणि इतरांवरील सर्व अत्याचारांना सपा पक्ष जबाबदार आहे. सत्ता सोडल्यानंतर त्यांच्या कारकिर्दीत उभारलेल्या उद्यानांची आणि स्मारकांची काळजी घेतली जात नाही. अशा स्थितीत राज्याच्या विद्यमान सरकारने याकडे लक्ष द्यावे, असं मायावती म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

SCROLL FOR NEXT