Mayawati esakal
देश

भाजपबाबत मायावतींच्या मवाळ भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह?

तपास यंत्रणांच्या भीतीपोटी भाजपच्या हातचे बाहुले झाल्याची चर्चा

शरत प्रधान

लखनौ : ‘‘बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती या भाजपच्या हातातील बाहुले झाल्या आहेत का,’’ असा सवाल उत्तर प्रदेशातील राजकीय वर्तुळात उपस्थित केला जाता आहे. उत्तर प्रदेशात मायावती यांची राजकीय ताकद काहीशी कमी झाली असली तरी, अद्यापही तेथील राजकारणात त्या महत्त्वाचा घटक म्हणून गणल्या जातात.

असे असतानाही लोकांना हा प्रश्न का पडला आहे, याचे कारण शोधायला गेल्यास मायावती यांनी मागील काही काळात समाज माध्यमांवर केलेल्या पोस्ट अथवा सार्वजनिक कार्यक्रमात मांडलेली भूमिका तपासून पाहता, प्रकर्षाने जाणवणारी बाब म्हणजे, मायावती यांच्यावर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे सत्ताधारी पक्षाचा प्रभाव आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते केंद्रीय तपास यंत्रणांच्या भीतीमुळे मायावती या भाजपच्या दबावाखाली आहेत. मायावती यांच्या बेहिशोबी मालमत्ता प्रकरणातील तपासाचे भिजत घोंगडे हे जाणीवपूर्वक ठेवण्यात आले आहे, जेणेकरून मायावतींवर दबाव राहील. या धोरणाचा भाजपला लाभ होत असल्याचेही येत आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर मायावती यांचा भाजपकडे असणारा कल अधिक ठळकपणे अधोरेखित झाला. या निवडणुकीत मायावती यांनी समाजवादी पक्षाशी केलेल्या युतीने भाजपसह सर्वांना आश्चर्यचा धक्का दिला. १

९९५ मध्ये लखनौ येथील ‘गेस्ट हाऊस’ प्रकरणानंतर मायावती आणि समाजवादी पक्षाचे नेते यांच्यामध्ये हाडवैर निर्माण झाले होते. त्यामुळे मायावती या समाजवादी पक्षाबरोबर युती करतील अशी अपेक्षा कोणीच केली नव्हती.

भाजपसाठी तर ही अत्यंत चिंतेची बाब होती कारण यामुळे बहुजन आणि ओबीसी वर्गाचे एकगठ्ठा मतदान भाजप विरोधात जाण्याची शक्यता होती. याच वेळी भाजपच्यावतीने मायावती यांना केंद्रीय तपास यंत्रणांच्या भोवऱ्यामध्ये अडकविण्याच्या धमक्या दिल्या जाऊ लागल्या होत्या.

याचा परिणाम असा झाला की, मायावती यांच्या पक्षाची मते समाजवादी पक्षाकडे वळणार नाहीत याची मायावती यांनी पुरेपूर काळजी घेतली. या उलट अखिलेश यादव यांनी मात्र मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाला पुरेपूर मदत केली.

अखिलेश यांची अशी अपेक्षा होती की यातून दोन्ही पक्षांना लाभ होईल. निकालानंतर मात्र अखिलेश यांना त्यांची फसवणूक झाल्याची जाणीव झाली. या युतीचा अखिलेश यांच्या समाजवादी पक्षाला चांगलाच फटका बसला, तर मायावतींना मात्र दहा जागांचा फायदा झाला.

त्यानंतरच मायावती यांचा भाजपकडे असणारा कल उघडणे जाणवू लागला. मग ती केंद्रातील निवडणूक असो किंवा राज्यातील. पोटनिवडणूक लढविण्याचा निर्णय २०२२ मध्ये झालेली विधानसभा निवडणूक किंवा २०२४ लोकसभा निवडणूक पहा, अखिलेश अथवा काँग्रेस यांच्यावर टीका करताना मायावती यांच्या शब्दांना जितकी धार येते तितकेच भाजपबद्दल बोलताना मायावतींचे शब्द मवाळ होतात.

अगदी सध्याची परिस्थिती पाहिली तरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरू असतानादेखील मायावती यांचा सप आणि काँग्रेसला असणारा विरोध अधिक तीव्र होतो आहे. इतकेच नव्हे तर पोटनिवडणुकांच्या विरोधात असणाऱ्या मायावती यांनी स्वतः या निवडणुकीत उतरण्याचा घेतलेला निर्णय हा सर्वांसाठी आश्चर्याचा धक्का आहे.

त्यामुळेच मायावती या केवळ मतविभाजनासाठी पोटनिवडणुकीत उतरल्याचा आरोप होत आहे. कारण पोटनिवडणुकीत मायावती यांच्या पक्षाचे उमेदवार उतरल्याने त्याचा थेट फायदा भाजपला होणार असल्याचे मानले जात आहे. सपच्या मतांमध्ये घसरण होत असल्याचेही दिसून येत आहे. या घडामोडीत मायावती यांनी एकदाच भाजपवर टीका केल्याचे दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT