mcd elections result 2022 asaduddin owaisi aimim gets votes less then nota check details  Sakal
देश

Delhi MCD Results : दिल्लीत ओवेसींच्या AIMIMला 'नोटा'नेही पछाडलं, अन् केजरीवालांना…

सकाळ डिजिटल टीम

Delhi MCD Results 2022 : दिल्ली महानगरपालिका निवडणुकीचे निकाल आले आता स्पष्ट झाले आहे. यावेळी एमसीडीवर आम आदमी पक्षाची सत्ता असणार आहे. गेल्या 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपला आपने बाहेर केले आहे. मात्र, एक्झिट पोलच्या निकालानुसार भाजपने आम आदमी पार्टीला कडवी टक्कर दिली असून ते प्रबळ विरोधी पक्षाच्या भूमिकेत राहणार आहेत.

तर दुसरीकडे, हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी त्यांच्या पक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन म्हणजेच एआयएमआयएमकडून यावेळी एमसीडी निवडणुकीत अनेक जागांवर उमेदवार उभे केले होते. विजयासाठी उमेदवार रिंगणात उतरवले पण निकाल अपेक्षेप्रमाणे लागला नाही. दिल्लीच्या मतदारांनी त्यांना जोरदार झटका दिला आणि त्यांना फक्त 0.62 टक्के मतं दिले आहेत. ओवेसींनी या निवडणुकीत जोरदार निवडणूक प्रचार आणि अनेक रॅली केल्या होत्या.

हेही वाचा - Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

ओवेसींच्या पक्षाला NOTA पेक्षा कमी मतं

दिल्लीतील मतदारांचा ओवेसींच्या पक्षापेक्षा NOTA वर जास्त विश्वास दाखवला आहे. दिल्लीतील जनतेने NOTA ला 0.78 टक्के मतदान केले. केवळ ओवेसींच्या पक्षाची ही अवस्था आहे, असे नाही. अखिलेश यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्षाची अवस्था यापेक्षाही वाईट आहे, त्यांना केवळ 0.01 टक्के मते मिळाली आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रीय लोकदलाला 0.09 टक्के, सीपीएमला 0.02 टक्के, सीपीआयला 0.01 टक्के आणि राष्ट्रवादीला 0.02 टक्के मतांवर समाधान मानावे लागले.

आप आणि भाजप मत विभागणी

आम आदमी पार्टी आणि भाजपच्या मतांच्या विभागणी बद्दल बोलायचे झाले तर एमसीडी निवडणुकीत आम आदमी पक्षाला 42.05 टक्के मते मिळाली. तर भाजपला 39.09 टक्के मते मिळाली. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत सुमारे 3 टक्के कमी मतदान झाले असून सुमारे 50 टक्के महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. दुसरीकडे, काँग्रेसच्या मतांची टक्केवारी बघितली तर पक्षाला 11.68 टक्के मते मिळाली आहेत. काँग्रेसनंतर अपक्षांना 3.46 टक्के मते मिळाली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif : 'ED प्रकरणात कोर्टानं मला क्लीन चिट दिलीये, शरद पवारांना याची माहिती नाही'; काय म्हणाले मुश्रीफ?

Navneet Rana: मोठी बातमी! नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा, अंगावार खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! नेमकं काय घडलं?

'PM मोदी उठता-बसता बाळासाहेबांचं नाव घेतात आणि उद्धव ठाकरेंच्याच पाठीत खंजीर खुपसतात'; प्रियांका गांधींचा हल्ला

Israel PM Netanyahu: इस्रायली पंतप्रधानांच्या घरावर बॉम्ब हल्ला; संरक्षण मंत्री म्हणाले, आता हद्द झाली...

Panchang 17 November: आजच्या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे

SCROLL FOR NEXT