Ashoka Chakra esakal
देश

भारताच्या ध्वजातील अशोक चक्राच्या 24 आऱ्यांचा काय आहे अर्थ; जाणून घ्या

सारनाथ येथे आढळलेल्या सिंहमुद्रेवर असलेल्या अशोक चक्रासारखे आहे

सकाळ डिजिटल टीम

भारताचा राष्ट्रध्वज संविधान समितीने २२ जुलै १९४७ रोजी निश्चित केला. त्या संबंधीचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. एकाला एक लागून असलेल्या आडव्या समान प्रमाणाच्या तीन पट्ट्यांचा तो आहे. वरती गर्द केशरी, मध्यभागी पांढरा आणि खालच्या बाजूला गर्द हिरवा, अशा क्रमाने हे तीन रंग आहेत.

मधल्या पांढऱ्या पट्ट्यावर निळ्या रंगाचे धर्मचक्र असून ते सारनाथ येथे आढळलेल्या सिंहमुद्रेवर असलेल्या अशोक चक्रासारखे आहे. चक्राला २४ आरे आहेत. डॉ. एस्. राधाकृष्णन् यांनी भारतीय राष्ट्रध्वजाच्या एकूण रचनेचे महत्त्व आहे.

जाणून घेवू ध्वजातील अशोक चक्राच्या 24 आऱ्याचा अर्थ

आरे पहिले संयम

संयमाने जीवन जगण्यासाठी प्रेरित करते.

आरे दुसरे आरोग्य

निरोगी जिवन जगण्यासाठी प्रेरित करते.

आरे तीसरे शांती

देशात शांती आणि एकता राखुन ठेवण्या साठी प्रेरित करते..

आरे चौथे त्याग

देश आणि समाजासाठी बलिदानासाठी तयार राहण्यासाठी प्रेरित करते.

आरे पाचवे नैतिकता

व्यवसायिक आणि जीवनात उच्च नैतिकता टिकवून ठेवण्यासाठी प्रेरणा देते.

आरे सहावे सेवा

जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा देशासाठी आणि समाजासाठी सेवा देण्यासाठी तयार राहने.

आरे सातवे क्षमा

मनुष्य आणि प्राण्यांना क्षमा करण्यांची भावना निर्माण करते.

आरे आठवे प्रेम

देशाबद्दल आणि समाजाबद्दल प्रेमाची भावना असने.

आरे नववे मैत्री

समाजात मैत्रीचे संबंध प्रस्थापित करणे.

आरे दहावे बंधुता

देशात बंधुत्वाची भावना निर्मान करणे.

आरे अकरावे संघटन

राष्ट्राची आणि अखंडता बळकट करण्याची प्रेरणा देते.

आरे बारावे कल्याण

देश आणि समाज्याच्या कल्याणासाठी झटण्यासाठी प्रेरणा देते.

आरे तेरावे समृध्दी

देश आणि समाजात समृध्दी करण्यासाठी प्रेरणा देते.

आरे चौदावे उद्योग

देशाला औद्योगीक प्रगतीसाठी मदत करण्याची प्रेरणा देते.

आरे पंधरावे सुरक्षा

देशाच्या संरक्षणासाठी नेहमी तयार राहण्याची प्रेरणा देते.

आरे सोळावे जागरूकता

सत्याबद्दल जागरूक असणे आणि अफवांवर विश्र्वास न ठेवण्याचे सांगते.

आरे सतरावे समता

समानतेवर आधारित समाजाची स्ठापना करणे.

आरे आठरावे पैसा

पैशाचा चांगला उपयोग करण्याचे प्रेरित करते.

आरे एकोणिसावे धोरण

देशातील धोरणावर विश्र्वास ठेवण्यास सांगते.

आरे विसावे न्याय

योग्य न्याय देण्यासाठी विश्र्वास ठेवण्यात सांगते.

आरे एकविसावे सहकार

एकत्र काम करण्याची प्रेरणा देते.

आरे बाविसावे कर्तव्ये

आपल्या कर्तव्यांचे पालन करण्याची प्रेरणा देते.

आरे तेविसावे अधिकार

आपल्या अधिकारांचा गैरवापर करू नये असे सांगते.

आरे चोविसावे बुध्दी

पुस्तकाच्या बाहेरील ज्ञान घेण्यासाठी प्रेरणा देते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT