meet scientists behind the success of chandrayaan 3 isro s somnath  sakal
देश

Chandrayaan 3 : ‘चांद्रयान-३’च्या यशाचे शिल्पकार

चंद्राच्या या भागावर यान उतरविणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे.

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘चांद्रयान-३’ उतरवून भारताने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. चंद्राच्या या भागावर यान उतरविणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. या यशात भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष एस.सोमनाथ यांच्यासह ‘चांद्रयान-३’ मोहिमेचे संचालक मोहन कुमार, रॉकेट संचालक बीजू सी.थॉमस यांचा मोठा वाटा आहे. ‘

इस्रो’च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ‘चांद्रयान-३’ या मोहिमेत ५४ महिला अभियंत्या आणि शास्त्रज्ञांचा सहभाग होता. ‘इस्रो’च्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या केंद्रातील विविध विभागांत त्या अधिकारीपदावर काम करीत आहेत.

एस.सोमनाथ (अध्यक्ष, इस्रो)

लँडर मोड्युलचे चंद्रावर आज सुलभ ‘लँडिग’ झाले, त्याची जबाबदारी एस.सोमनाथ यांच्याकडे होती. त्यांचे वडील हिंदीचे शिक्षक होते. विज्ञानाची आवड असल्याने सोमनाथ यांनी मेकॅनिकल अभियांत्रिकीची पदवी घेतलेली आहे. रॉकेट विज्ञानात रस असल्याने त्यांनी १९८५मध्ये ‘इस्रो’त नोकरी स्वीकारली.

युवा अभियंता म्हणून ‘इस्रो’त काम करीत असताना प्रक्षेपणाच्या तयारीत असलेल्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान ‘पीएसएलव्ही’तील बिघाड दुरुस्त करण्यात त्यांनी सोमनाथ यांनी दोन वरिष्ठांना सहकार्य केले होतो. ‘इस्रो’च्या अध्यक्षपदी नियुक्ती होण्यापूर्वी सोमनाथ हे विक्रम साराभाई अवकाश केंद्र (व्हीएसएससी) आणि ‘लिक्विड प्रोपल्शन सेंटर’चे संचालक होते. ‘इस्रो’च्या रॉकेट तंत्रज्ञानाच्या विकासासाठीचे हे प्राथमिक केंद्र आहे.

डॉ.एस.उन्नीकृष्णन नायर (संचालक, विक्रम साराभाई अवकाश केंद्र)

विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे (व्हीएसएससी) प्रमुख असलेले डॉ.एस.उन्नीकृष्णन हे नामांकित शास्त्रज्ञ आहेतच शिवाय मल्याळी लघुकथाकारही आहेत. त्यांनी केरळ विद्यापीठाचे मॅकेनिकल अभियंते आहेत.

बंगळूरमधील भारतीय विज्ञान संस्थेतून एरोस्पेस विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले असून भारतीय औद्योगिक संस्था, मद्रासमधून मॅकेनिकल अभियांत्रिकीत पीए.डी केली आहे. उन्नीकृष्णन यांनी १९८५मध्ये ‘व्हीएसएससी’ मध्ये कारकीर्द सुरू केली.

‘ पीएसएलव्ही’, ‘जीएसएलव्ही’ आणि ‘एलव्हीएम -३’ या यानांसाठी विविध अवकाश प्रणाली आणि तंत्रज्ञान विकासात त्यांचा सहभाग होता. मानवी अंतराळ मोहिमेच्या अभ्यासाच्या टप्प्यापासून ते आहेत. ‘इस्रो’त सर्वांत नव्याने स्थापन झालेल्या मानवी अंतराळ केंद्राचे (एचएसएफसी) संस्थापक संचालक या नात्याने गगनयान मोहिमेच्या चमूचे नेतृत्व केले आहे.

डॉ. पी. वीरमुथुवेल (मोहीम संचालक, चांद्रयान-३)

डॉ. पी. वीरमुथुवेल यांचे वडील रेल्वे कर्मचारी होते. आकाशाला गवसणी घालण्याचे त्यांचे ध्येय होते. तमिळनाडूतील विल्लुपुरम जिल्ह्यातील वीरमुथुवेल हे मॅकेनिकल अभियंते आहेत.आयआयटी मद्रासमधून पीएच.डी करून ते २०१४मध्ये ‘इस्रो’त सहभागी झाले.

एम. शंकरन (संचालक, यू. आर. राव. सॅटेलाइट सेंटर)

‘इस्रो’च्या सर्व उपग्रहांची रचना, विकास आणि कार्यप्रणलीसाठी देशातील यू. आर. राव. सॅटेलाइट सेंटर (यूआरएससी) च्या संचालकपदाचा कार्यभार विख्यात शास्त्रज्ञ एम. शंकर यांनी १ जून २०२१ मध्ये सांभाळला होता. ते सध्या दूरसंचार, दिशादर्शक, दूरसंवेदन, हवामान आणि आंतरग्रहीय संशोधनासारख्‍या क्षेत्रात विविध प्रकारच्या उपग्रहांसाठी नेतृत्व करीत आहे.

कल्पना कालहस्ती (सहाय्यक प्रकल्प संचालक)

कालहस्ती चित्तूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या कल्पना कालहस्ती यांनी चेन्नईत बी.टेक केले आहे. ‘इस्रो’त नोकरी करण्याचे स्वप्न त्यांनी लहानपणापासून पाहिले होते आणि ते पूर्णही केले. बी.टेकनंतर त्या २०००मध्ये शास्त्रज्ञ म्हणून त्या ‘इस्रो’त रूजू झाल्या.

सुरुवातीला त्यांना श्रीहरीकोटामध्ये पाच वर्षे काम केले. बंगळूरमधील उपग्रह केंद्रात त्यांची २००५मध्ये बदली झाली. पाच उपग्रहांच्या आरेखनात त्यांनी भाग घेतला होता. ‘चांद्रयान-२’ मोहिमेतही त्यांचा सहभाग होता. ‘चांद्रयान-३’ मोहिमेच्या सहाय्यक संचालक म्हणून त्या काम करीत आहेत.

यूट्युबवर ८० लाख लोकांनी पाहिले थेट प्रक्षेपण

‘चांद्रयान-३’चे विक्रम लँडर बुधवारी सायंकाळी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. ही ऐतिहासिक घटनेचे थेट प्रक्षेपण ‘इस्रो’च्या यूट्युब वाहिनीवर ८० लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिले. थेट प्रक्षेपणावेळी सर्वांत जास्त यूजर मिळालेली ‘इस्रो’ची वाहिनी जगातील पहिली ठरली आहे.

‘चांद्रयान-३’च्या ‘लँडिंग’च्या आधी ‘इस्रो’च्या यूट्यूब वाहिनीचे २६ लाख सब्सक्रायबर होते. आता यान यशस्वीपणे उतरल्यानंतर ही संख्या ३५ लाखांवर गेली आहे. याचे प्रमाण पाहिले तर केवळ एका तासात ‘इस्रो’ने नवे दहा लाख सब्सक्रायबर जोडले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शिवसेना उबाठा गटाचे बाळा नर विजयी

Ambernath Assembly Election 2024 Result Live: अंबरनाथमध्ये बालाजी किणीकरांचा विजयी चौकार; शिवसेनेचे राजेश वानखेडे चितपट

SCROLL FOR NEXT