mehbooba-mufti 
देश

'लिचिंग करणाऱ्यांना पाकिस्तानात फाशी, मात्र भारतात होतोय सत्कार!'

भाजपने काश्मीरी पंडितांच्या स्थितीचा केवळ फायदा घेतला.

सकाळ डिजिटल टीम

श्रीनगर : पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाच्या (PDP) अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी बुधवारी जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातून भाजपवर हल्लाबोल केला. या प्रसंगी पाकिस्तानचे कौतुकही त्यांनी केले. प्रसारमाध्यमांशी बोलताना मुफ्ती म्हणाल्या, पाकिस्तानमध्ये एका व्यक्तीला लिंच केले गेले, तेव्हा तेथे ६ जणांना फाशी आणि १२ जणांना आजीवन कारावासाची शिक्षा दिली गेली. भारतात २०१५ नंतर कित्येक जण लिंच झाले. मात्र गुन्हेगारांना पुष्पहार घालून सत्कार केला जात आहे. तर तेथील न्याय आणि येथील न्याय तंत्रात हाच फरक आहे. पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) म्हणाल्या, की त्यांच्याजवळ (भाजप) लोकांना देण्यासाठी काहीच नाही, तर मग हिंदू-मुस्लिम भांडण, मुस्लिमांची हत्या, मशिदींवर दाव करणे एवढे राहिले आहे. जर तुमच्याजवळ हिटलरप्रमाणे काही नियोजन असेल तर सांगून द्या, की तुम्ही मुसलमानांबरोबर काय करणार आहात?, असा सवाल त्यांनी भाजपला केला. (Mehbooba Mufti Criticize BJP And Praising Pakistan's Justice For Lynching Issue)

भाजपकडून काश्मीरी पंडितांचे शोषण

भाजपने (BJP) काश्मीरी पंडितांच्या स्थितीचा केवळ फायदा उठवल्याचा मेहबूबा मुफ्ती यांनी आरोप केला. ते त्यांच्या कल्याणासाठी काहीच करत नाही. भाजपने काश्मीरी पंडितांचे केवळ शोषण केले आहे. काश्मीरी पंडितांना (Kashmiri Pandit) तंबूंमधून फ्लॅटमध्ये आणण्याचे काम मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना, मुफ्ती साहेब आणि गुलामनबी आझाद किंवा उमर अब्दुल्ला यांच्या काळात झाले. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना काश्मीर पंडितांना रोजगार पॅकेज दिले गेल्याचे मुफ्ती म्हणाल्या.

भाजपने काश्मीरसाठी काय केले?

भाजपने काय केले? गेल्या चार वर्षांपासून काश्मीरवर प्रत्यक्षपणे त्यांचे शासन आहे. त्यांनी मला सांगावे की त्यांनी काश्मीरी पंडितांसाठी कोणते एखादे काम केले आहे? काश्मीर अशांत असतानाही घरी बसलेल्या काश्मिरी पंडितांना वेतन आपण मुख्यमंत्री असताना दिल्याचे त्या म्हणाल्या. जेव्हा २०१६ मध्ये परिस्थिती चांगली नव्हती, तेव्हा आम्ही काश्मीरी पंडितांना घर बसल्या १७ महिन्यांचे वेतन दिल्याचे मेहबूबा मुफ्ती यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT