Rahul Gandhi 
देश

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या 'भारत जोडो यात्रे'दरम्यान भाजप कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी; राहुल गांधी चिडले अन्...

आसाममध्ये ही यात्रा सुरु असताना काही तरुणांनी हातात भाजपचे झेंडे आणि श्रीरामाचे झेंडे घेऊन घोषणाबाजी केली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रेत काल आसाममध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केली. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना धक्काबुक्की करण्यात आली. यामुळं राहुल गांधी चिडले आणि थेट त्यांच्या बसमधून खाली उतरले. यामुळं काहीकाळ गोंधळ निर्माण झाला होता. (Mess by BJP workers during Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra Rahul Gandhi got angry)

काय घडलं नेमकं?

राहुल गांधी यांची सध्या भारत जोडो न्याय यात्रा सुरु असून ती काल आसाममध्ये होती. यावेळी या यात्रेदरम्यान, काही भाजपचे कार्यकर्तांनी हुल्लडबाजी करण्याचा आणि राहुल गांधींची बस अडवण्याचा प्रयत्न केला. हातात भाजपचे झेंडे आणि रामाची प्रतिमा असलेले भगवे झेंडे घेऊन जयश्रीराम आणि मोदी मोदी अशी घोषणाबाजी करत होते.

यावेळी कार्यकर्त्यांना समजावण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भुपेन बोरा यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. यावेळी या कार्यकर्त्यांनी त्यांना धक्काबुक्की केली. यामध्ये बोरा हे जखमी झाल्याचा दावा काँग्रेसनं केला आहे. (Latest Marathi News)

राहुल गांधी चिडले

यानंतरही भाजपचे कार्यकर्ते ऐकत नसल्यानं बसमध्ये बसलेले राहुल गांधी चिडले आणि ते बसमधून खाली उतरले. ते थेट या घोषणाबाजी करणाऱ्या लोकांमध्ये शिरले, त्यानंतर तिथं उपस्थित असलेल्या पोलिसांनी आणि राहुल गांधींच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. यामुळं काहीकाळ गोंधळाचं वातावरण सुरु होतं. (Marathi Tajya Batmya)

काँग्रेसची भाजपवर टीका

काँग्रेसनं पुढे म्हटलं की, हा प्रकार भाजपच्या द्वेषाची मानसिकता आणि खळबळीचा पुरावा आहे. पण या भेकड गोष्टींमुळं आम्ही घाबरणार नाही, द्वेषावर कायम प्रेमाचा विजय होईल. द्वेषाविरोधात प्रेमाचा संदेश देण्यासाठी ही यात्रा असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे.

काँग्रेस हिंदूविरोधी - मालवीय

तर दुसरीकडं भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमिय मालवीय यांनी राहुल गांधींचा हा व्हिडिओ ट्विट केलं. जय श्रीराम आणि मोदी मोदीच्या घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांपुढं राहुल गांधी चिडल्याचं म्हटलं आहे. हिंदूविरोधी काँग्रेसनं अयोध्येतील प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण नाकारल्यानं येत्या काळात ते देशातील जनतेला कसे सामोरे जातील? असंही मालवीय यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT