Jammu Kashmir Labor Killed : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा एका सामान्य नागरिकाची गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर काश्मीर खोऱ्यात पुन्हा एकदा टार्गेट किलिंगचे प्रकार सुरु झाल्याची चर्चा असून, जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील अजस येथील सदुनारा येथे ही घटना घडली आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये दहशत पसरली असून, सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ह्त्या करण्यात आलेली व्यक्ती मुळची बिहार येथील असून, येथे मजूर म्हणून काम करत होती. मोहम्मद जलील (वय 19 रा. अमरेज ) असे हत्या करण्यात आलेल्या मजुराचे नाव आहे. रात्री 12.30 च्या सुमारास अतिरेक्यांनी मोहम्मद जलील यांच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडल्या. त्यानंतर जलील यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांदीपोरा जिल्ह्यातील अजस तहसीलमधील सदुनारा गावात ही घटना घडली. 19 वर्षीय मोहम्मद जलील रा. अमरेज असे या मजुराचे नाव आहे. जलील हा मधेपुरा जिल्ह्यातील बेसड गावचा रहिवासी होता आणि तो बिहारहून येथे कामासाठी आला होता. गुरुवारी रात्री 12.30 च्या सुमारास अतिरेक्यांनी मोहम्मद जलील याच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडल्या. त्यानंतर जलीलला तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी हल्लेखोराच्या शोधासाठी परिसराची नाकाबंदी सुरू केली आहे.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील काकरन भागात दहशतवाद्यांनी एका गैर-काश्मीरी व्यक्तीची गोळ्या घालून हत्या केली होती. दहशतवाद्यांनी स्थानिक नसलेल्यांना खोऱ्यातून बाहेर पडण्याचा इशारा दिला असून, अशा प्रकारे बिगर काश्मिरी लोकांची हत्या करून दहशतवादी तेथे भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
स्थानिक नसलेल्या नागरिकांमध्ये घबराट
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून होणाऱ्या टार्गेट किलिंगच्या या घटनांमुळे सरकारी कर्मचारी आणि तेथे काम करणाऱ्या स्थलांतरित मजुरांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. गेल्या काही महिन्यांपासून खोऱ्यात अशा टार्गेट किलिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. खोऱ्यातील बिगर काश्मिरी लोकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे या लोकांचे पलायनही तेथून सुरू झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.