Farhan Akhtars picture  Twitter
देश

नोएडा स्टेडियमवर रियल हिरो ऐवजी सिनेमातील पोस्टर का?

मिल्खा सिंग यांच्या आयुष्यावर आधारित 'भाग मिल्खा भाग' चित्रपटातील फोटो लावण्यापेक्षा रियल हिरो मिल्खा सिंग यांचा फोटो याठिकाणी लावायला हवा होता, अशा प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

सुशांत जाधव

भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचे शुक्रवारी निधन झाले. देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या दिग्गज धावपटूला देशभरातूनच नव्हे तर जगभरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. दरम्यान दिल्लीतील नोएडा स्टेडियमवरील रनिंग ट्रॅकवर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लावलेल्या फोटोवरुन सोशल मीडियावर नाराजी उमटताना दिसत आहे. नोएडातील स्टेडियमवर मिल्खा सिंग यांची भूमिका साकारलेल्या फरहान अख्तर याचे पोस्टर लावण्यात आले आहेत. मिल्खा सिंग यांच्या आयुष्यावर आधारित 'भाग मिल्खा भाग' चित्रपटातील फोटो लावण्यापेक्षा रियल हिरो मिल्खा सिंग यांचा फोटो याठिकाणी लावायला हवा होता, अशा प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. नोएडा स्टेडियमचे प्रशासक नशेत आहेत का? असा सवाल नेटकरी विचारत आहेत. (Milkha Singh biopics Bhaag Milkha Bhaag character Farhan Akhtars picture put up running track at the Noida Stadium)

अनिषा दत्ता नावाच्या ट्विटर युजर्सने नोएडा स्टेडियमवरील हा प्रकार निदर्शनास आणून दिला. ट्विट बायोमध्ये पत्रकार असा उल्लेख असलेल्या अनिषा दत्ता यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्टेडिमवर लावलेला 'भाग मिल्खा भाग' चित्रपटातील सीनचा फोटो शेअर केला आहे. रनिंग ट्रॅकवर लावलेला हा फोटो हटवून रियल हिरो मिल्खा सिंग यांचा फोटो लावावा, अशी विनंती त्यांनी नोएडा स्टेडियमच्या प्रशासकांना केली आहे. ही मागणी अगदी योग्य असल्याचे सांगत नेटकऱ्यांनी नोएडा स्टेडियमवरील व्यवस्थापनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थिीत केले आहे.

या प्रकारातून व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार दिसून येतो. मिल्खा सिंग यांचा फोटो सर्च केल्यानंतर जो फोटो मिळाला तो लावला गेला असावा, असा अंदाज व्यक्त करत हा फोटो तात्काळ बदलण्याची गरज असल्याचे मत एका नेटकऱ्याने व्यक्त केले आहे. यांना रियल हिरो मिल्खा सिंग माहित नाहीत? यावर विश्वास बसत नाही, अशी प्रतिक्रिया एकाने दिली आहे. गेल्या काही वर्षांपासून देशातील रियल हिरोंच्या आयुष्यावर आधारित चित्रपट तयार होताना दिसते. दिग्गजांचा प्रेरणादायी प्रवास चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचतोय ही चांगलीच गोष्ट आहे. पण नोएडाच्या स्टेडियमवरील रनिंग ट्रॅकवर रियल हिरोऐवजी बॉलिवूड चित्रपटातील दृश्य झळकणे ही न पटणारी अशीच गोष्ट आहे.

भारताचे महान आणि प्रेरणादायी व्यक्तमत्व असलेले मिल्खा सिंग महिन्याभरापासून कोरोनाशी झुंज देत होते. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ते लवकरच सुखरुप घरी परतावे, अशी पार्थना देशवासिय करत होते. शुक्रवारी रात्री अचाकन त्यांना त्रास सुरु झाला. ऑक्सिजन लेव्हल कमी झाली. देशवासियांना त्यांच्या धक्कादायक निधनाचे वृत्त समजले. 13 जून रोजी त्यांच्या पत्नी निर्मल कौर यांचे निधन झाले होते. त्यांच्यापाठोपाठ मिल्खा सिंग आपल्यातून निघून गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्रामधील मतमोजणीपूर्वी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जिलेबी बनवण्याची तयारी सुरु

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT