Lok Sabha Election Esakal
देश

Lok Sabha Election: प्राण जाई पर बचन न जाई... लोकसभेतल्या अपयशामुळे मंत्र्याने दिला राजीनामा; नेमकं प्रकरण काय?

अंकिता खाणे (Ankita Khane)

राजस्थानमधील भजनलाल सरकारमधील मंत्री किरोडी लाल मीणा यांनी सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. जयपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू होती. सध्या राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाही. अशा स्थितीत सरकार त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करू शकते. बातम्यांनुसार, किरोडी लाल मीना यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान दौसा लोकसभा मतदारसंघातून भाजपचा पराभव झाल्यास राजीनामा देईन, असे सांगितले होते.

किरोडी लाल मीना यांनी केलं ट्विट

राजीनाम्याच्या बातम्यांदरम्यान किरोडी लाल मीणा यांनी पुन्हा एकदा ट्विट केले आहे. ज्यामध्ये मीना यांनी लिहिले आहे की, 'रघुकुल रीति सदा चलि आई, प्राण जाई पर बचन न जाई', ज्याचा संबंध लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी दिलेल्या विधानांशी जोडला जात आहे.

गेल्या काही दिवसांत किरोडी लाल मीणा यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री भजन लाल शर्मा यांना अनेक पत्रे लिहिली आहेत. 14 मे रोजीच्या पहिल्या पत्रात मीना यांनी शहरातील गांधीनगर भागातील एका बहुमजली निवासी प्रकल्पात सरकारी तिजोरीचे 1,146 कोटी रुपयांचे संभाव्य नुकसान निदर्शनास आणले होते. अशी पत्रे दिल्यामुळे किरोडीलाल मीणा यांनी आपल्याच सरकारच्या विरोधात आघाडी उघडली असल्याची चर्चा होती.

‘या सातपैकी एकही जागा गमावली तर मी राजीनामा देईन’

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला ७ जागांची जबाबदारी दिली होती, असे किरोरी लाल मीना यांनी दौसा येथील पंतप्रधान मोदींच्या सभेत सांगितले होते. या वेळी या सातपैकी एकही जागा गमावल्यास मी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा देईन. या सातपैकी एक अतिशय महत्त्वाची जागा जिथे किरोडीलाल मीना यांची मजबूत पकड मानली जाते ती म्हणजे दौसा. जिथून काँग्रेसच्या मुरारीलाल मीना यांनी मोठा विजय मिळवला आहे.

निवडणुकीचे निकाल आल्यानंतर त्यांनी राजीनामा न दिल्याबद्दल काँग्रेसनेही अनेकदा भाष्य केले होते. आज त्यांच्या राजीनाम्याची बातमी समोर आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gunaratna Sadavarte Death Threat : बिग बॉसच्या घरात जाण्याआधी गुणरत्न सदावर्ते यांना जीवे मारण्याची धमकी!

Stock Market: चीनच्या शेअर बाजारात विक्रमी वाढ! सध्या कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करणे फायद्याचे?

Varsha Usgaonkar : "माझ्या भावनांचा उद्रेक होईल यासाठी टपून राहिले होते.." वर्षा उसगांवकरांनी केले खुलासे

Rahul Gandhi यांच्याकडून शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण होणं ही दुर्देवी घटना, शिंदे गटाच्या आमदाराची जीभ पुन्हा घसरली!

Latest Marathi News Live Updates: छत्रपती संभाजीनगर शहरात २० हून अधिक कॅफेवर पोलिसांच्या धाडी

SCROLL FOR NEXT