ललितपूर : सामूहिक बलात्कार झाल्यानंतर तक्रार नोंदविण्यासाठी गेलेल्या तरुणीवर पोलिस अधिकाऱ्याने बलात्कार (Crime Against Girl) केल्याचा आरोप आहे. उत्तर प्रदेशातील ललितपूर (Lalitpur Uttar Pradesh) जिल्ह्यात ही घटना घडली असून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले असून तो फरार आहे.
गेल्या २२ एप्रिलला एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून चार तरुणांनी तिच्यावर बलात्कार केला होता. आरोपींच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर पीडितेने न्याय मिळावा म्हणून पोलिस ठाण्यात धाव घेतली असता न्याय देण्याऐवजी तिचा छळ करण्यात आला. तिच्यावर पोलिस अधिकाऱ्याने बलात्कार केला, असा आरोप १३ वर्षीय अल्पवयीन मुलीने केला आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून आरोपी पोलिस अधिकारी आणि इतर आरोपींना अटक करण्यासाठी पोलिस पथके तयार करण्यात आली आहे. पीडितेने या घटनेची तक्रार पोलिस अधीक्षकांकडे केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलिस अधिकारी आणि इतरांविरुद्ध बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आरोपी पोलिस अधिकाऱ्याला अटक होणे बाकी आहे. आम्ही एका आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी करत आहोत. SHO निलंबित असून तो गुन्हेगार आहे. त्यामुळे त्याला अटक करण्यासाठी आम्ही पथके तयार केली आहेत. एका एनजीओने मुलीला माझ्या कार्यालयात आणले. यानंतर मुलीने सर्व प्रकार सांगितला, असं ललितपूरचे एसपी निखिल पाठक यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.