mirza galib 
देश

Mirza Ghalib: अजरामर झालेला शायर मिर्ज़ा गालिब; जाणून घ्या खास 6 गोष्टी

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली (Mirza Ghalib Birth Anniversary) - मिर्ज़ा गालिब (Mirza Ghalib) हे केवळ हिंदूस्तानचे नाही तर जगातील एक लोकप्रिय शायर आहेत. त्यांचे स्थान खूप वरचे आहे. मिर्ज़ा गालिब यांचा जन्म 27 डिसेंबर 1797 साली झाला होता. गालिब यांच्या शायरीचा वापर लोक रोजच्या आयुष्यात किंवा त्यांच्या बोली भाषेत करताना दिसतात. गालिब फारसी भाषेतही शायरी करायचे, पण ते मुख्यत: उर्दू भाषेतील शायरीसाठी प्रसिद्ध आहेत. गालिब यांच्या गझलला फक्त प्रेमाच्या संदर्भात पाहिलं जायचं, पण त्यांनी जीवन दर्शन आणि त्याचे रहस्य उत्तमरित्या दाखवले आहे. त्यांच्या जन्मदिवसाच्या पार्श्वभूमीवर काही खास गोष्टी जाणून घेऊ...

- मिर्ज़ा गालिब किंवा मिर्ज़ा असदुल्लाह बेग खान यांचा जन्म 27 डिसेंबर 1797 रोजी उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये झाला. गालिब यांच्या वडिलांचे नाव मिर्ज़ा अबदुल्ला बेग आणि आईचे नाव इज्जत-उत-निसा बेगम होते. गालिब 5 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. 
             
                      हर एक बात पे कहते हो तुम कि तू क्या है
                      तुम्हीं कहो कि ये अंदाज़-ए-गुफ़्तगू क्या है

- गालिब यांचे लग्न वयाच्या 13 व्या वर्षी उमराओ बेगमसोबत झाले. मिर्ज़ा गालिब यांना मुले-बाळे नव्हती. 
                  
                  हुई मुद्दत कि 'ग़ालिब' मर गया पर याद आता है,
                  वो हर इक बात पर कहना कि यूँ होता तो क्या होता !

-गालिब यांनी वयाच्या 11 वर्षी शायरी लिहिण्यास सुरुवात केली होती. मिर्ज़ा गालिब मुगल साम्राज्याच्या अंतिम वर्षातील उर्दू आणि फारशी शायर म्हणून प्रसिद्ध आहेत. गालिब यांनी मुगल साम्राज्याचा सूर्यास्त आणि ब्रिटिश साम्राज्याचा सूर्योद्य असे दोन्ही पाहिले. त्यांच्या शायरी मध्ये 1857 मधील क्रांतीचा उल्लेख आढळतो. मिर्ज़ा आपल्या शायरीसाठीच नाही, तर आपल्या लिहिलेल्या पत्रासाठीही ओळखले जातात.

                     हमको मालूम है जन्नत की हक़ीक़त लेकिन,
                     दिल के खुश रखने को 'ग़ालिब' ये ख़याल अच्छा है  

- मिर्ज़ा गालिब यांचा मृत्यू 15 जानेवारी 1869 मध्ये झाला. गालिब यांच्या मृत्यूनंतर त्यांना हजरत निजामुद्दीनच्या दरग्याजवळ पुरण्यात आलं.

                   इश्क़ पर जोर नहीं है ये वो आतिश 'ग़ालिब',
                   कि लगाये न लगे और बुझाये न बुझे

- गल्ली कासिम जान बल्लीमारान, चांदनीचौक जेथे गालिब राहत होते, त्याठिकाणी आता गालिब मेमोरियल बनवण्यात आले आहे. याठिकाणी त्यांच्या अनेक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. 

                    तुम न आए तो क्या सहर न हुई
                    हाँ मगर चैन से बसर न हुई
                    मेरा नाला सुना ज़माने ने
                    एक तुम हो जिसे ख़बर न हुई

-मिर्ज़ा गालिब यांच्या जीवनावर आधारित 1954 मध्ये ''मिर्ज़ा गालिब'' नावाचा चित्रपट बनला होता. प्रसिद्ध गीतकार गुलजार यांनी 1988 मध्ये ''मिर्ज़ा गालिब'' नावाची एक टीव्ही सीरियल बनवली होती. 

                      जला है जिस्म जहाँ दिल भी जल गया होगा
                       कुरेदते हो जो अब राख जुस्तजू क्या है

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी: रोहित शर्मा पहिल्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियात होतोय दाखल, सोबत भारी गोलंदाजही टीम इंडियाच्या मदतीला येतोय

'राष्ट्रवादी फुटीनंतर पक्ष सोडून गेलेल्‍या गद्दारांना पाडाच'; शरद पवारांचा अजितदादांच्या आमदारांना इशारा

Ajit Pawar: पार्थ पवार म्हणतात, भाजप-शिवसेनेसोबत गेल्याने आम्ही बदलणार नाहीत; आम्ही तर...

Fraud Calls : अलर्ट! या नंबरवरुन येणारे कॉल आहेत धोक्याचे; क्षणात होऊ शकतो मोबईल हॅक अन् अकाउंट रिकामं

Devendra Fadnavis : महाविकास आघाडीकडून व्होट जिहादचे काम, आता एक व्हावे लागेल : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT