amit shah narendra modi file photo
देश

मिशन २०२२: अमित शहांच्या उपस्थितीत पाच राज्यांच्या निवडणुकांची तयारी

भाजपची रणनीती आखण्यात वेग: शहा आणि नड्डा यांच्या बैठकीतून मोहिमेचे नियोजन

विनायक होगाडे

नवी दिल्ली : पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुका आणि काही राज्यातील पंचायत निवडणुकांच्या तयारीला वेग देणाऱ्या सत्तारूढ भाजपने आता प्रत्यक्ष रणनीती अंतिम करण्यास प्राधान्य दिले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी आज एका दिवसात दोन बैठका घेऊन केंद्रीय मंत्री आणि भाजप पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचा संदेश दिला. ‘मिशन २०२२’ साठी भाजपने वेगवान तयारी सुरू केली आहे. बूथ पातळीपर्यंतचे संघटन आणखी मजबूत करणे आणि कोरोना काळात भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या सामाजिक कामांची माहिती तळागाळापर्यंत पोचवणे, या पायावर भाजपचा प्रचाररथ धावणार हे स्पष्ट होत आहे.

शहा यांनी आज दिवसातून दोन वेळा नड्डा यांच्या घरी बैठक घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी अयोध्येतील विकास कामांचा आढावा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेत होते त्याच वेळी दिल्लीतच शहा हे नड्डा यांच्या निवासस्थानी भाजपच्या पदाधिकाऱ्यांबरोबर मंथन करत होते. सकाळच्या बैठकीला भाजपचे सर्व महासचिव, अनेक राष्ट्रीय पदाधिकारी , स्मृति इराणी व किरण रिजिजू यांच्यासह काही केंद्रीय मंत्री उपस्थित होते तर संध्याकाळी नड्डा आणि शहा यांनी पक्षाच्या देशभरातील काही महत्त्वाच्या पक्षनेत्यांबरोबर ऑनलाइन संवाद साधल्याचे समजते.

मिशन २०२२ मध्ये उत्तर प्रदेशाचे स्थान स्वाभाविकपणे ठळक आहे. उत्तर प्रदेश ही लोकसभेतील विजयाची चावी मानली जात असल्याने पुढचे वर्ष मिनी लोकसभा निवडणुकीचे असल्याचे भाजप नेत्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र देशाकडे सर्वाधिक लक्ष देताना पुढच्याच वर्षी निवडणुकांना सामोरे जाणाऱ्या गोवा व अन्य राज्यांच्या निवडणुकांकडेही दुर्लक्ष न करण्याची सूचना भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाने दिली आहे. त्यानुसार शहा यांनी आज पक्षनेत्यांना काही टिप्स दिल्या.

भाजपच्या प्रचार मोहिमेची आखणी, त्यातील कोण नेते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात याची चाचपणी आणि तसे प्रयत्न, पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांचे दौरे आणि पंतप्रधान मोदी तसेच केंद्रीय मंत्र्यांचे दौरे हे निश्चित करण्याचे काम दीनदयाळ उपाध्याय मार्ग आणि अशोका रस्त्यावरील भाजप व कार्यालयांमध्ये युद्धपातळीवर सुरू आहे. आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हातही भाजपच्या पाठीशी सक्रियपणे असणार असल्याचे यापूर्वीच उघड झाले आहे.

मोदी, शहांचे लवकरच झंझावती दौरै

पंतप्रधान आणि शहा लवकरच उत्तर प्रदेशाचे झंझावाती दौरे सुरू करणार आहेत. मोदी सरकारच्या उज्वला, मुद्रा आणि जनधन सारख्या योजना किती कोटी भारतीयांपर्यंत पोहोचल्या याची अपटुडेट माहिती संकलित करून नव्याने लघुपट तसेच सीडी ड्राईव्हमधील माहिती तयार करण्याचे काम भाजप करत आहे. पक्षाचा समाजमाध्यम विभागही सक्रिय झाला असून या विभागाचे राष्ट्रीय प्रमुख अमित मालवीय यांनाही आजच्या बैठकीत बोलावून घेतले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: सोनं झालं 5,000 रुपयांनी स्वस्त; अवघ्या 15 दिवसांत सोन्याच्या भावात मोठी घसरण, आज काय आहे भाव?

Dehradun Accident: देहराडूनमध्ये भीषण अपघात, सहा तरुणांचा मृत्यू; काय आहे इनसाईड स्टोरी? पोलिसांकडे अद्याप तक्रार नाही

IND vs AUS: विराट कोहली जखमी? काल अचानक स्टार फलंदाज ऑस्ट्रेलियातील हॉस्पिटलमध्ये गेला अन्...

Latest Maharashtra News Updates : 'कटेंगे तो बटेंगे' हा देशाचा इतिहास- देवेंद्र फडणवीस

Sanjay Raut : भाजप एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीच काय विरोधी पक्ष नेता पण करणार नाही , संजय राऊत यांचा खोचक टोला

SCROLL FOR NEXT