Big Solar Storms coming on earth esakal
देश

ISRO Solar Mission : सूर्याचं गुपित आदित्य एल-1 मुळे बाहेर येणार? भविष्यातील धोक्यांची आधीच मिळणार माहिती

Manoj Bhalerao

ISRO Aditya L-1 Mission : चांद्रयान-३ च्या यशस्वी मोहीमेनंतर भारताने आता सुर्याकडे कूच केली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांना अशी अपेक्षा आहे की, भारताच्या पहिल्या सौर मोहिमेत 'आदित्य एल-१'द्वारे मिळवलेल्या माहितीच्या आधारे विश्लेषण करुन सुर्याचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळाविषयी नविन माहिती जगासमोर येणार आहे. ही बहुप्रतिक्षित मोहीम २ सप्टेंबर या दिवशी इस्रोद्वारे लाँच करण्यात येईल.

येणाऱ्या दशकांमध्ये किंवा काळामध्ये पृथ्वीवरील जलवायु परिवर्तन समजण्यासाठी ही माहिती महत्वाची ठरेल. सौर भौतिक शास्त्राचे प्राध्यापक दीपांकर बॅनर्जी म्हणाले की 'आदित्य एल-१ पृथ्वीपासून सुमारे १.५ मिलियन किलोमीटरवरील एका ठिकाणी जाणार आहे.' प्राध्यापक दीपांकर त्या टीमचा भाग आहे, जिने १० वर्षाआधी या मोहीमेची कल्पना केली होती.

प्राध्यापक म्हणाले की, "पृथ्वीवरील आपले अस्तित्व आणि जीवन सुर्यामुळे आहे, कारण सुर्य आपला सर्वात जवळील तारा आहे. आपल्याला सर्व उर्जा सुर्यापासून मिळते. त्यामुळे हे समजणे महत्वाचे ठरेल की सुर्य ज्या प्रकारची उर्जा सध्या उत्सर्जित करतोय, नंतरही असेचं किरणांचे उत्सर्जन होणार की यात बदल होतील."(Latest Marathi News)

बॅनर्जी म्हणाले की, "जर येणाऱ्या काळात सुर्याने आतासारखी उर्जा उत्सर्जित केली नाही, तर याचा आपल्या दैनंदिन आयुष्यावर मोठा परिणाम होईल."

आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्सेस (एआरआयईएस) चे संचालक, शास्त्रज्ञ म्हणाले की जर लॅग्रॅन्गियन बिंदूपासून सूर्याचे दीर्घकाळ निरीक्षण केले जाऊ शकते, तर आतापर्यंत अज्ञात असलेल्या सूर्याच्या इतिहासाचे मॉडेल करणे अपेक्षित आहे. मानवजातीला.. असे आढळून आले आहे की दर 11 वर्षांनी सूर्याच्या चुंबकीय क्रियेत बदल होतो, ज्याला सौरचक्र म्हणतात. बॅनर्जी म्हणाले की सौर वातावरणातील चुंबकीय क्षेत्र देखील कधीकधी आपत्तीजनक बदल घडवून आणते ज्यामुळे सौर वादळे निर्माण होतात.

L1 जवळील कक्षेतून सूर्याचा अभ्यास करणे हे आदित्य-L1 मोहिमेचे उद्दिष्ट आहे. या मोहीमेअंतर्गत सात पेलोड्स सौर कक्षेच्या जवळ घेऊन जाईल, जे वेगवेगळ्या वेव्ह बँडमध्ये सूर्याच्या तीनही थरांचे निरीक्षण करेल. इस्रोच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की आदित्य एल-१ हे पुर्णपणे स्वदेशी आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: मुंबईहून पुण्याला आता दीड तासांत जाता येणार! गडकरींनी दिली नव्या हायवेची माहिती

Tirupati Laddu: तिरुपती प्रसाद प्रकरणावरून केंद्राने मागविले उत्तर; दोषींवर होणार कठोर कारवाई

प्रो कबड्डी सीझन २ विजेता U Mumba संघ ११ व्या हंगामासाठी सज्ज; प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

IND vs BAN: Virat Kohli ची विकेट वादग्रस्त ठरली, पण पठ्ठ्याने १७ धावा करूनही मोठा पराक्रम केला

Nitin Gadkari : सरकारने कंपन्या चालवल्यामुळे मुलभूत प्रश्नच सुटले नाहीत; पुण्यात नितीन गडकरींचं विधान

SCROLL FOR NEXT