Miyazaki Mango File Photo
देश

अबब! भारतात पिकतोय २.७० लाखांचा आंबा; जाणून घ्या सविस्तर...

आंब्याच्या प्रजातीच्या संरक्षणासाठी सुरक्षा रक्षक आणि श्वानांची नियुक्ती

Amit Ujagare (अमित उजागरे)

भोपाळ : आंबा हा फळांचा राजा. एखाद्याला हे फळ आवडत नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही. आंब्याच्या हापूस प्रजातीला तर परदेशात प्रचंड मागणी आहे. पण देशात अशी एक आंब्याची प्रजाती समोर आली आहे ज्याची किंमत लाखो रुपये आहे. या दुर्मिळ आंबा प्रजातीच्या सुरक्षेसाठी मध्य प्रदेशातील एका दाम्पत्यानं चक्क सुरक्षा रक्षक आणि श्वानांची नियुक्ती केली आहे. (Miyazako Mango grown in India at Rupees two lakh fifty thousand per kg you need to know)

आंब्याच्या सर्वसाधारण प्रजातींच्या तुलनेत हा चर्चेत असलेला आंबा आपल्या रंगामुळं वेगळा ठरला आहे. जापानमध्ये आंब्याची ही प्रजाती मियाजाकी म्हणून सर्वसाधारणपणे आढळून येते. भारतातील आणि दक्षिण पूर्व आशियातील काही भागातही आंब्याची ही प्रजाती आढळते. मध्य प्रदेशात एका दाम्पत्याने ही आंब्याची प्रजाती जतन करु ठेवली आहे. या दाम्पत्याला एकदा ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान एका व्यक्तीनं या आंब्याचं वाण दिलं होतं. त्यानंतर त्यांनी त्याची चांगली जपणूक करुन मोठी आमराई फुलवली. या दाम्पत्याच्या माहितीनुसार, या आंब्याच्या प्रजातीचा रंग माणिकाप्रमाणं आहे. या आंब्याला जपानीत ताइयो-नो-तमागो (सूर्याचं अंड) म्हणून ओळखलं जातं.

ही आंब्याची प्रजाती जपानमधील क्यूशू प्रांतातील मियाजाकी शहरात आढळून येते. या एका आंब्याचं वजन ३५० ग्रॅमपेक्षा अधिक असतं तसेच यामध्ये साखरेचं प्रमाणं १५ टक्क्यांहून अधिक असतं. एप्रिल ते ऑगस्टदरम्यान या आंब्याचा मोसम असतो. हे मियाजाकी आंबे जगात सर्वाधिक महागडे आंबे आहेत. गेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात २.७० लाख रुपये प्रतिकिलो प्रमाणं विकले गेले.

मियाजाकी आंबे संपूर्ण जपानमध्ये मिळतात आणि ओकिनावानंतर जपानमध्ये या आंब्याचं उत्पादन सर्वाधिक आहे. रेड प्रमोशन सेंटरच्या माहितीनुसार, या आंब्यामध्ये अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतं तसेच यामध्ये बीटा-कॅरोटीन आणि फॉलिक अॅसिडही असतं. जे दृष्टी कमी असलेल्या लोकांसाठी फायदेशीर असतं.

मियाजाकी आंब्याचं उत्पादन ७०च्या दशकाच्या शेवटी आणि ८०च्या दशकाच्या सुरुवातीला सुरु झालं होतं. शहरांमध्ये उष्ण वातावरण, उष्णतेचा मोठा काळ आणि भरपूर पावसानं मियाजाकीतील शेतकऱ्यांना आंब्याच्या शेतीसाठी ओळखलं जात आहे. आता हा आंबा इथलं प्रमुख उत्पादन आहे. या मियाजाकी आंब्यांना संपूर्ण जपानमध्ये निर्यातीपूर्वी एका कठोर चाचणी आणि परीक्षणातून जावं लागतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मालेगावमतदार संघात शिवसेनेचे उमेदवार दादा भुसे १ लाख ६ हजार ००६ मतांनी विजयी

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT