Mizoram assembly election 
देश

Mizoram Assembly Elections: मिझोराममधील 'या' मतदान केंद्रांवर झाला होता गोंधळ! पुन्हा होणार मतदान

रिटर्निंग ऑफिसरच्या अहवालानुसार निवडणूक आयोगानं या ठिकाणी फेरनिवडणुकीचा निर्णय घेतला.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : मिझोराम विधानसभा निवडणुकीसंबंधी मोठी बातमी समोर आली आहे. एका मतदार केंद्रावर गोंधळ झाल्याच्या पार्श्वभूमीवर इथलं मतदान रद्द करण्यात आलं असून या ठिकाणी फेरमतदान घेण्यात येणार आहे.

येत्या १० नोव्हेंबर रोजी या केंद्रावर पुन्हा मतदान होणार आहे. निवडणूक आयोगानं रिटर्निंग ऑफिसरचा अहवाल आणि इतर साक्षी पुराव्यांच्या आधारे या केंद्रावर फेरनिवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. (Mizoram Assembly reelections to be held at 13 Muallungthu polling station in on 10th November 2023)

रिटर्निंग ऑफिसरला अहवाल

रिटर्निंग ऑफिसरच्या अहवालानुसार, 20 एजॉल दक्षिण III विधानसभा मतदारसंघातील 13 मुआलुंगथू मतदान केंद्रावर ७ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान पार पडलं होतं, पण या ठिकाणी गोंधळ झाला होता. त्यामुळं या केंद्रावर शुक्रवार, १० नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत नव्यानं मतदान घेण्याचे निर्देश दिले. (Latest Marathi News)

दरम्यान, हे मतदान केंद्र वगळता मंगळवारी इथं ४० जागांसाठी विधानसभेसाठी मतदान शांततेत पार पडलं. यामध्ये ८.५७ लाख मतदारांपैकी ८० टक्के मतदरांनी आपला हक्क बजावला.

यामध्ये सत्ताधारी पक्ष मिझो नॅशनल फ्रन्ट, प्रमुख विरोधी पक्ष जोरम पिपुल्स मुव्हमेंट आणि काँग्रेस या तीन पक्षांनी सर्व ४० जागांवर उमेदवार उभे केले होते.

तर भाजपनं केवळ २३ जागांच लढवल्या. तसेच आपनं ४ तर २७ जागांवर अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढवली. ३ डिसेंबर रोजी या ठिकाणी मतमोजणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT