देश

सर्वाधिक मुलं असणाऱ्या जोडप्याला मिळणार १ लाखाचं बक्षीस

लोकसंख्या वाढीसाठी मंत्र्यांनीच केली अजब घोषणा

शर्वरी जोशी

सध्याची वाढती लोकसंख्या आणि आर्थिक ताण लक्षात घेता अनेकजण हम दो, हमारे दो हा नियम पाळत आहेत. तर दुसरीकडे मात्र, मिझोरमच्या mizoram एका मंत्र्यांनीच नागरिकांना हा नियम मोडीत काढण्याचं आवाहन केलं आहे. ज्या जोडप्यांना सर्वाधिक मुलं आहेत. त्यांना १ लाख रुपयाचं बक्षीस देण्याची घोषणा या मंत्र्यांनी केलं आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या घोषणेनंतर सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. (mizoram-minister-robert-romawia-royte-announces-1-lakh-cash-prize-for-having-highest-number-of-children)

सध्या सोशल मीडियावर मिझोरमचे mizoram क्रीडामंत्री रॉबर्ट रोमाविया रोयते (Robert Romawia Royte) यांची चर्चा रंगली आहे. रोयते यांनी त्यांच्या मतदार संघातील नाागरिकांसाठी एक ऑफर दिली आहे. त्यानुसार, ज्या जोडप्यांना जास्त मुलं असतील त्यांना ते १ लाख रुपये, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह बक्षीस म्हणून देणार आहेत.

रायते यांचा घोषणेमागील नेमका उद्देश काय?

सध्याच्या घडीला मिजो समाजाची (Mizo Communities) लोकसंख्या घटताना दिसत आहे. त्यामुळे या समाजाची लोकसंख्या वाढावी या उद्देशाने रोमाविया रोयते (Robert Romawia Royte) यांनी ही घोषणा केली आहे. समाजातील घटती लोकसंख्या पाहता पुढे हा समाज नामशेष होऊ नये हा त्यामागील उद्देश असल्याचं रोयते यांचं मत आहे.

रोयते यांची अजब घोषणा

देशातील वाढती लोकसंख्या नियंत्रणात येण्यासाठी अनेक राज्य प्रयत्न करत असतानाच रोयते यांनी ही अजब घोषणा केली आहे. रविवारी 'फादर्स डे'च्या निमित्ताने रोयते यांनी ही घोषणा केली. "आयजोल पूर्व - २ विधानसभा क्षेत्रातील ज्या स्त्री किंवा पुरुषाला जास्त संतती असतीत, त्यांना १ लाख रुपये प्रोत्साहन रक्कम म्हणून दिली जाईल", असं रोयते म्हणाले. परंतु, या दरम्यान त्यांनी घटत्या लोकसंख्येचा उल्लेख केला नव्हता.

दरम्यान, मिझोरममध्ये अनेक Mizo Communities असून अरुणाचल प्रदेशनंतर मिझोरमच कमी लोकसंख्या असलेलं राज्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Mohammad Shami ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ठोकली दावेदारी; गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवली चमक

Goa Tourism : जाऊ फुलपाखरांच्या गावा! गोव्यात बटरफ्लाय कंझर्व्हेटरीला नक्की भेट द्या, फि,वेळ आणि ठिकाण जाणून घ्या सर्वकाही

Vinod Tawde : अजित पवारांना सोबत घेतल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्टच सांगितले कारण...

Vinod Tawde: पुन्हा शरद पवार पावसात भिजले; भाजपचे तावडे म्हणाले, हा जिंकण्याचा 'भ्रम'...

SCROLL FOR NEXT