Abu Azmi  Sakal
देश

"...म्हणून मी पाकिस्तानला लाथ मारून भारतात आलो" - अबू आझमी स्पष्टच बोलले

इस्लामच्या धार्मिक ग्रंथात जे सांगितलं आहे ते कोणीही बदलू शकत नाही असं आझमी म्हणाले

सकाळ डिजिटल टीम

रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटनंतर बऱ्याच चर्चांना उधाण आलं आहे. त्यानंतर समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी त्यावर टीका करत अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली न्यूड फोटोशूट खपवून घेतलं जातं, तर हिजाबला विरोध का केला जातोय? असा सवाल उपस्थित केला आहे. त्याचबरोबर भारतात समान कायदे आहेत म्हणून मी भारतात आलो असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

(Abu Azmi And Pakistan)

"शरीराचं प्रदर्शन करणाऱ्याला स्वातंत्र्य आहे आणि संपूर्ण शरीर झाकणाऱ्या हिजाबला विरोध का केला जातो?" असा सवाल त्यांनी केला. "रणवीर सिंगवर माझा आक्षेप नाही पण कोणीही निर्वस्त्र दिसलं नाही पाहिजे असा कायदा देशात आहे. आणि जो निर्वस्त्र दिसेल त्याच्यावर केस होते पण आज देशात उघड्या शरीराचं प्रदर्शन चालू आहे, हे कसं चालतं?" असं आझमी एका माध्यमांशी बोलताना म्हणाले.

"इस्लाममध्ये महिलांनी संपूर्ण शरीर झाकणारे हिजाब घालणे हा आमचा धार्मिक अधिकार आहे. या देशाने आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं त्यामुळेच मी पाकिस्तानात गेलो नाही आणि आज इथे मुस्लिमांवर बंधणे घातले जातात." असं मत आझमी यांनी व्यक्त केलं.

"माझ्या देशात हिंदू, मुस्लीम, शीख, इसाई या सर्व जातींना समान अधिकार दिले आहेत. सर्वांना समान मुलभूत अधिकार दिलेले आहेत. आम्हाला विचारांवर चालण्याचं स्वातंत्र्य आणि धार्मिक स्वातंत्र्य भारताने दिले म्हणून मी पाकिस्तानला लाथ मारून भारतात आलो." असं वक्तव्य आझमी यांनी केलं.

"आज भारतात मुस्लिम महिलांना हिजाबच्या नावाखाली अपमानित केलं जात आहे. त्यांना मारलं जात आहे. एकीकडे लोक निर्वस्त्रपणे हिंडत आहेत तर एकीकडे हिजाबला विरोध केला जात आहे. हे काय चालू आहे माझ्या देशात?" असं आझमी म्हणाले आहेत.

इस्लामच्या धार्मिक ग्रंथात जे सांगितलं आहे ते कोणीही बदलू शकत नाही, आणि तुम्ही त्याला विरोधही करू शकत नाहीत. दरम्यान रणवीर सिंगबाबत जे मला वाटलं ते मी जनतेसमोर मांडलं आहे, आता पुढे काय करायचं ते जनतेने ठरवायचं असं आझमी म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT