Mobile Phone Charging In House Explodes 4 children died parents condition critical in UP Marathi news  
देश

Mobile Phone Blast : चार्जिंगला लावलेल्या फोनचा भीषण स्फोट; चार मुलांचा होरपळून मृत्यू, आई-वडिल गंभीर

Mobile Phone Charging In House Explodes : मोबाईल फोन सध्या आपल्या सर्वांची गरज बनला आहे. मात्र या मोबाईल फोनचे अनेक तोटे देखील आहेत.

रोहित कणसे

Mobile Phone Charging In House Explodes : मोबाईल फोन सध्या आपल्या सर्वांची गरज बनला आहे. मात्र या मोबाईल फोनचे अनेक तोटे देखील आहेत. उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे घरात चार्जिंगला लावण्यात आलेल्या फोनचा स्फोट झाला असून या दुर्घटनेत चार मुलांचा मृत्यू झाला आहे.

मोबाईलचा स्फोट झाल्याने घराला आग लागल्याने कुटुंबातील सहा जण गंभीर रित्या भाजले आहेत. या घटनेत चार लहान मुलांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

जॉनी हे मजूर म्हणून काम करतता. पण होळी असल्याने शनिवारी ते घरीच होते, यावेळी त्यांची पत्नी बबीता या स्वयंपाक करत होत्या तर त्यांची मुलगी सारिका (१०), निहारिका (८), मुलगा गोलू (६) आणि दुसरा मुलगा कालू (५) हे देखील घरातच होते.

मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या घरात मोबाईल चार्जिंगला लावलेला होता. विजेच्या बोर्डवक चार्जरमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झालं आणि ठिणगी बेडवर अंथरलेल्या फोमच्या गादीवर पडली. यामुळे घरात अचानक आग लागली. बघता बघता आग संपूर्ण घरात पसरली. यावेळी बबीता,सारिका आणि जॉनी यांनी मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला ज्यामध्ये ते चांगलेच होरपळले.

आवाज ऐकून शेजारी मदतीला धावले, त्यांनी सर्वांना घराच्या बाहेर काढलं आणि तत्काळ खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं. त्यानंतर त्यांना मेरठच्या लाला लाजपत राय मेडिकल कॉलेजमध्ये ऱेफर करण्यात आलं.

उपचारादरम्यान निगारिका आणि कालू यांनी प्राण सोडले तर बाकीच्या कुटुंबियांवर उपचार सुरू होता. मात्र सकाळी होईपर्यंत चारही मुलांचा मृत्यू झाला. तर आई-वडिलांची स्थिती गंभीर आहे.

कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार , घरात मोबाईल चार्जिंगला लावण्यात आला होता ज्याचा अचानक स्फोट झाला ज्यामध्ये चार मुलांसह सहा जणांचं कुटुंब गंभीररित्या भाजलं. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, अचानक स्फोट झाला आणि घराला आग लागली. आगीपासून वाचण्यासाठी मुलं पळू लागले, त्यांना वाचवण्याच्या धडपडीत सर्व जण भाजले.

मेरठचे एसएसपी रोहित सिंह यांनी सांगितलं की पव्वनपुरम स्टेशन हद्दीत संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घरात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आगीत होरपळलेले सर्व जण मुजफ्परनगर येथील राहाणारे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT