Maharashtra Bjp Slams Ncp Chief Sharad Pawar For His Comment On Pm Modi  esakal
देश

Modi attack on NCP: राष्ट्रवादीवर घोटाळ्यांचे आरोप करत PM मोदींनी वाचली यादी; भाजपच्या मेळाव्यात केली टीका

सिंचन घोटाळ्याचा उल्लेख करत मोदींनी केले गंभीर आरोप

Amit Ujagare (अमित उजागरे)

भोपाळ : भाजपचा कार्यकर्ता मेळावा आज मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ इथं पार पडला. या मेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी विरोधकांच्या बैठकीवर सडकून टीका केली तसेच राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना त्यांच्या घोटाळ्यांची यादीच वाचून दाखवली. (Modi attack on NCP read list of scams Criticized in a BJP meeting Bhopal)

मोदी म्हणाले, काही दिवसांपूर्वी देशातील प्रमुख विरोधी पक्षांचा एक फोटोसेशनचा कार्यक्रम पार पडला. या बैठकीत सहभागी झालेल्या पक्षांचा इतिहास पाहिला तर समजेल की या सर्व पक्ष म्हणजे एकूण कमीत कमी २० लाख कोटींच्या घोटाळ्यांची गॅरंटी आहेत. (Latest Marathi News)

जर राष्ट्रवादी काँग्रेसबाबत सांगायचं झालं तर राष्ट्रवादीवर सुमारे ७० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचा आरोप आहे. यामध्ये विविध घोटाळ्यांचा समावेश आहे. ज्यात महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा, महाराष्ट्र सिंचन घोटाळा आरोप, अवैध खनन घोटाळा अशी यांच्या घोटाळ्यांची मोठी यादी आहे,अशा शब्दांत मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला. (Marathi Tajya Batmya)

दरम्यान, त्यांनी काँग्रेससह आरजेडी, डीएमके आदी पक्षांवर असलेल्या घोटाळ्यांची आरोपांचा देखील पाढा वाचला. यामध्ये मोदींनी काँग्रेसला टार्गेट करताना विरोधकांच्या २० लाख कोटींच्या घोटाळ्यांपैकी काँग्रेसचा घोटाळाच एकट्यानं लाखो कोटींचा आहे.

यामध्ये १ लाख ८६ हजार कोटींचा कोळसा घोटाळा, १ लाख ७४ हजार कोटींचा टू जी घोटाळा, ७० हजार कोटींचा कॉमनवेल्थ घोटाळा, १० हजार कोटींचा मनरेगा घोटाळा, हेलिकॉप्टरपासून सबमरीनपर्यंत काँग्रेसच्या घोटाळ्यांचा कोणताही असं क्षेत्र नाही जिथं काँग्रेसचा घोटाळा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT