Sugar Exports Sakal digital
देश

Sugar Exports: मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याची शक्यता, देशात दर कमी ठेवण्यावर भर

Modi government likely to ban sugar export: भारताचा साखरेच्या निर्यातीवर निर्बंध आणण्याचा विचार...

Sandip Kapde

Sugar Exports: 

गहू, तांदूळ आणि कांद्यानंतर किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि देशात पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी भारत साखरेच्या निर्यातीवर निर्बंध आणण्याचा विचार करत आहे. ग्राहक व्यवहार विभाग अशा निर्यात निर्बंधांच्या बाजूने असल्याचे सूत्रांनी सांगितले. 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या गाळप हंगामात भारत साखर निर्यातीवर बंदी घालण्याची शक्यता आहे.

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात या संदर्भातील अधिसूचना जारी होण्याची अपेक्षा असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. साखर हंगाम दरवर्षी 1 ऑक्टोबर रोजी सुरू होतो आणि पुढील वर्षी 30 सप्टेंबर रोजी संपतो.

आर्थिक वर्ष 2022 मध्ये भारताने विक्रमी 11 दशलक्ष टन (MT) साखर निर्यात केली. तर आर्थिक वर्ष 2023 मध्ये, देशातील साखरेच्या किमती नियंत्रित करण्यासाठी आणि पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी निर्यातीचे प्रमाण मर्यादित केले होते. परदेशातील विक्री रोखण्यासाठी भारताने शेवटच्या वेळी 2016 मध्ये साखर निर्यातीवर 20% कर लादला होता.

"आर्थिक वर्ष 2023 साखर हंगामाच्या वर्षाच्या सुरूवातीस, सरकारने साखर निर्यातीचे प्रमाण सुमारे 6 मेट्रिक टन इतके मर्यादित केले होते. दरम्यान वाढत्या किमतीमुळे हा कोटा देखील टप्प्याटप्प्याने संपुष्टात येत आहे," असे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. देशांतर्गत बाजारात किंमती कमी ठेवण्यावर प्राधान्य असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

भारतातील किरकोळ महागाई ऑगस्टमध्ये 6.83% होती आणि अन्नधान्य महागाई जुलैमध्ये 11.51% वरून ऑगस्टमध्ये 9.94% पर्यंत कमी झाली.

या मान्सून हंगामात महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये पाऊस सामान्यपेक्षा कमी आहे. अनेक ऊस उत्पादक जिल्ह्यांमध्येही सरासरीपेक्षा 50 टक्के कमी पाऊस झाला. देशातील साखर उत्पादनापैकी निम्मे साखर उत्पादन या राज्यांमधून येते.

केंद्राने व्यापारी, घाऊक विक्रेते आणि साखर कारखान्यांना साप्ताहिक साखर साठा जाहीर करणे बंधनकारक केले आहे. बाजारात साखरेची उपलब्धता टिकवून ठेवण्यासाठी आणि साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा साखर उत्पादक आणि प्रमुख निर्यातदार आहे. मात्र, अलीकडच्या काळात इथेनॉल तयार करण्यासाठी ऊस पिकाचा मोठा भाग वापरला जात आहे. याशिवाय त्यासाठी इंधन प्रकल्प उभारण्यावरही त्यांचा भर आहे. चालू साखर हंगाम 2023 मध्ये, सुमारे 45 लाख मेट्रिक टन अतिरिक्त साखर इथेनॉलमध्ये रूपांतरित झाली आहे. (Latest Marathi News)

सरकारने 2025 पर्यंत 60 लाख मेट्रिक टनांहून अधिक अतिरिक्त साखर इथेनॉल उत्पादनात वळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सरकारने साखर हंगाम 2022-23 मध्ये सुमारे 6 मेट्रिक टन साखरेच्या निर्यातीला परवानगी दिली होती, जी मागील वर्षी 11 मेट्रिक टन होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT