Amit Shah esakal
देश

Amit Shah: मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, यंदा 300 पार जाऊ; अमित शहांनी व्यक्त केला विश्वास

कर्नाटकात मोठी हार पत्करावी लागल्यानंतर भाजपसमोर येणारी लोकसभा देखील आव्हानात्मक असणार आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

दिसपूर : येत्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. तसेच भाजप ३०० पेक्षा अधिक जागा जिंकेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. आसाममधील सभेमध्ये बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे. (Modi will become PM for third time with 300 seats in 2024 Amit Shah in Assam rally)

शहा म्हणाले, "२०२४ मध्ये ३०० जागांसह नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. आसाममध्ये एका सभेा संबोधित करताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. यापूर्वी देखील आसाममध्येच भाजपच्या दिब्रूगढ कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमात त्यांनी याचा पहिल्यांदा उच्चार केला होता. लोकसभेला आसाममधून भाजप १२ ते १४ जागा जिंकतील असा दावाही त्यांनी केला होता. ईशान्य भारतातील आठ राज्यांमध्ये पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार आहे. यामुळेच ईशान्येचा विकास झाला असल्याचंही ते म्हणाले होते"

एकेकाळी ईशान्य भारत हा काँग्रेसचा गड मानला जात होता. राहुल गांधींनी नुकतीच भारत जोडो यात्रा केली. त्यानंतर ईशान्य भारतात निवडणुका आल्या, त्यानंतर काँग्रेसचा इथून सुपडा साफ झाला. आता काँग्रेस कुठेही दिसत नाही. राहुल गांधी परदेशात जातात तिथं जाऊन देशावर टीका करतात, अशा शब्दांत शहांनी राहुल गांधींवर टीकाही केली होती.

दरम्यान, नुकत्याच कर्नाटकात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला दारुण पराभव झाला तर काँग्रेसनं स्पष्ट बहुमत मिळत घवघवीत यश मिळवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याठिकाणी 22 सभा घेतल्या होत्या तसेच अमित शहा यांच्यासह इतरही अनेक भाजप नेत्यांनी इथं सभा घेतल्या. पण तरीही भाजपला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळं दक्षिण भारतातलं एकमेव राज्यही भाजपनं गमावलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT