mohammad hamid ansari 
देश

अन्सारी आणि भाजप पुन्हा आमने सामने

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - संसदेच्या वरिष्ठ सभागृहात गदारोळ सुरू असताना कोणतेही विधेयक मंजूर करू नये, हा तात्विक आग्रह कायम धरणारे माजी उपराष्ट्रपती व सभापती महंमद हमीद अन्सारी यांनी, तसे करण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दबाव आणल्याचा गौप्यस्फोट केल्यानंतर अन्सारी आणि भाजप पुन्हा आमनेसामने आले. 

खुद्द अन्सारी यांच्याच कार्यकाळात ‘यूपीए’च्या राजवटीत आंध्र प्रदेश पुनर्रचना व ऐतिहासिक महिला विधेयकासह तब्बल १३ विधेयके राज्यसभेच्या महागोंधळातच मंजूर झाली असा दावा भाजप नेत्यांनी राज्यसभेच्या आजी-माजी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने केला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अन्सारी यांनी ‘बाय मेनी ए हॅप्पी ऍक्‍सीडेंट’ या पुस्तकात मोदींनी दबाव आणल्याचा अल्लेख केला आहे. तीन कृषी कायदे अलीकडे राज्यसभेत ज्या पद्धतीने मंजूर करून घेण्यात आले त्याचा संदर्भ अन्सारींच्या म्हणण्यास आहे. 
लोकसभेत बहुमत असले की राज्यसभेचे नियम पायदळी तुडवण्याचा अधिकार सरकारला मिळतो असे भाजप आघाडीला वाटत असल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे. राज्यसभेचे सभापती म्हणून१० वर्षे कामकाज पहाणारे अन्सारी यांनी विरोधकांच्या गोंधळात कोणतेही विधेयक मंजूर होणार नाही, असे यूपीए-भाजप या सरकारांना बजावले होते. २०१४ च्या जूनमध्ये मोदी यांच्या पहिल्याच भाषणात राज्यसभेत कॉंग्रेसने मोठा गोंधळ घातला तेव्हा मोदींनी अन्सारींकडे पहात, ‘पहा, तुमच्या अध्यक्षतेखालीच हे सारे सुरू आहे,’ असा शेरा मारला होता. 

जुन्या प्रसंगाचा दाखला
अन्सारी यांनी ताज्या पुस्तकात एक प्रसंग वर्णन केला आहे. त्यानुसार एक दिवस पंतप्रधान मोदी अचानक त्यांच्या दालनात आले व सदनात गोंधळ सुरू असला तरी विधेयके का मंजूर होत नाहीत, असे त्यांना विचारले. अन्सारी यांनी त्यांना, गोंधळात विधेयके मंजूर करणे योग्य नसल्याचे सांगताच मोदी यांनी, ‘तुमच्याकडून जबाबदारीची मोठी अपेक्षा होती. पण तुम्ही मला मदत करत नाही,’ असे सांगितले व नाराजीने ते तिथून बाहेर पडले. दरम्यान, अन्सारी यांच्या ताज्या दाव्याला खोडून काढताना राज्यसभेच्याच काही अधिकाऱ्यांनी २००७ ते २०१७ पर्यंतच्या अन्सारी यांच्या कारकिर्दीतील २०१४ पर्यंतच्या काळात राज्यसभेत किमान १३ विधेयके प्रचंड गोंधळात मंजूर झाली, याकडे लक्ष वेधले आहे. 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूर आणि स्नेहा दुबेंमध्ये काट्याची टक्कर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Maharashtra Assembly 2024 Result : फडणवीस की पटोले; ठाकरे की शिंदे; काका की पुतण्या? इथे पाहा सर्वांत वेगवान आणि अचूक निकाल LIVE Video

SCROLL FOR NEXT