Mohan Bhagwat esakal
देश

Mohan Bhagwat: माणसाला `सुपरमॅन’ व्हायचे असते पण तो ‘भगवान’ही बनू पाहतो; मोहन भागवत काय म्हणाले?

Mohan Bhagwat Statement: मोहन भागवत ग्रामीण पातळीवरील कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये बोलत होते. ‘विकास भारती’ या संस्थेकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळ वृत्तसेवा

गुमला (झारखंड): ‘‘माणसाच्या महत्त्वाकांक्षा या कधीच संपत नाहीत त्यामुळे लोकांनी मानवतेसाठी काम करायला हवे. स्वविकासाच्या प्रक्रियेमध्ये माणसाला `सुपरमॅन’ व्हायचे असते आणि त्यानंतर तो ‘देवता’ आणि ‘भगवान’ही बनू पाहतो. त्याच्या मनामध्ये विश्वरूपाची आस असते पण त्याच्यानंतर पुढे काय असते? हे कुणीच खात्रीलायकपणे सांगू शकत नाही,’’ असे सूचक वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज केले.

ते ग्रामीण पातळीवरील कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये बोलत होते. ‘विकास भारती’ या संस्थेकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

‘‘अनेकजण हे माणूस असतात पण त्यांच्यामध्ये माणसाचे गुण मात्र नसतात. आधी त्यांनी माणूस व्हायला हवे. स्वतःच्या बाह्य आणि अंतर्गत प्रगतीसाठी आणि विकासासाठी कोणत्याही प्रकारची मर्यादा नसते. प्रत्येकाने मानवतेसाठी अथक मेहनत घ्यायला हवी. कार्यकर्त्याने त्याच्या कामावर कधीच समाधानी असता कामा नये. आरोग्य, पर्यावरण आणि शिक्षण या क्षेत्रामध्ये अथकपणे काम करायला हवे. या सगळ्याला कोठेच अंत नाही पण सातत्याने काम करत राहणे हाच यावरील एकमेव प्रभावी उपाय आहे. ज्या प्रमाणे भारत हा एक सुंदर देश आहे त्याचप्रमाणे आपण हे जग देखील सुंदर करायला हवे,’’ असे भागवत यांनी नमूद केले.

निसर्गाशी संबंध ठेवावा लागेल

‘‘ भारताचा स्वभाव हा जंगल आणि शेतांमधून साकार झाला असून त्यातूनच सनातन धर्माचा जन्म झाला आहे. सनातन संस्कृती आणि धर्म हा शाही महालांमधून आलेला नाही तर तो आश्रम आणि जंगलांतून आला आहे. बदलत्या काळानुरूप आपली वेशभूषा बदलेल पण स्वभाव मात्र बदलणार नाही. बदलत्या काळानुरूप आपण आपल्या कामाची पद्धत देखील बदलली पाहिजे. त्यासाठी आपल्याला मार्ग बदलावे लागतील. ज्यांचा निसर्गाशी संबंध कायम राहील ते विकसित ठरतील,’’ असे भागवत यांनी नमूद केले.

गावांवर विश्वास

‘‘ जंगलामध्ये आजही आपले आदिवासी बांधव हे शांततेने जीवन व्यतीत करत आहेत. त्यांच्याबाबतीत आपल्याला शिक्षण आणि आरोग्य या दोन क्षेत्रामध्ये अधिक भरीव काम करायला हवे. आम्ही गावकऱ्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो पण शहरांमध्ये मात्र खूप काळजी घ्यावी लागते. आपण कोणाशी बोलत आहोत? हे पडताळून पाहावे लागते,’’ असे भागवत यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

SCROLL FOR NEXT