SBI Recruitment 2021 esakal
देश

खुशखबर! SBIचं ग्राहकांना मोठं गिफ्ट; FD वर जादा व्याज देणाऱ्या अमृत कलश योजनेला मुदतवाढ

संतोष कानडे

नवी दिल्लीः देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने ग्राहकांना एक खूशखबर दिली आहे. एसबीआयकडे सर्वात जास्त व्याज देणारी एक योजना होती. ती १५ ऑगस्ट रोजी समाप्त होणार होती. परंतु आता बँकेने या एफडी योजनेला मुदतवाढ दिलेली आहे.

एसबीआयच्या जादा व्याजदर देणाऱ्या एफडी स्कीमचं नाव अमृत कलश आहे. या योजनेची तारीख वाढवण्यात आलीय. यासंदर्भात स्टेट बँक ऑफ इंडियाने एक सर्क्युलर जारी केलं आहे. त्यामध्ये या योजनेची तारीख ३१ डिसेंबर २०२३ करण्यात आलीय. योजनेची शेवटची तारीख १५ ऑगस्ट २०२३ होती.

एसबीआयने अमृत कलश योजना १२ एप्रिल २०२३ रोजी लाँच केली होती. बँकेची ही एक विशेष योजना आहे. एनआरआय ग्राहकसुद्धा या योजनेमध्ये गुंतवणूक करु शकत आहेत. अमृत कलश योजेनेमध्ये ग्राहक २ कोटींपेक्षा कमी रक्कम ४०० दिवसांसाठी ठेवू शकतात. विशेष म्हणजे प्रत्येक महिन्याला, तीन महिन्याला आणि सहा महिन्याला व्याज दिलं जातं.

अमृत कलश योजनेत व्याज किती?

SBIने आपल्या नियमित ग्राहकांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अमृत कलश योजना सुरु ठेवली आहे. यामध्ये ७.१ टक्के आणि ७.६ टक्के व्याज देण्यात येतं. दोन कोटींपेक्षा कमी रिटेल एफडीवर ही सुविधा मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: जिल्हा परिषद भरतीमध्ये घोळ? 19 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

इलेक्शन ड्युटी नाकारणाऱ्या ८७२ कर्मचाऱ्यांना नोटिसा! प्रशिक्षणालाही दांडी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काढली यादी; आता दाखल होणार गुन्हे अन्‌ शिस्तभंगाची कारवाई

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

Mumbai School : मुंबईत शाळा-महाविद्यालयांना तीन दिवस सुट्टी, काय आहे कारण? घ्या जाणून!

Sakal Podcast: जोगेश्वरी-गोरेगाव दरम्यान १२ तासांचा ब्लॉक ते विम्याचे पैसे लाटण्यासाठी युवक बनले अस्वल

SCROLL FOR NEXT