Monsoon withdrawal likely from September 25 weather Update IMD On monsoon withdrawal date 2023  Sakal
देश

Monsoon Withdrawal : मान्सूनचा परतीचा प्रवास कधी सुरू होणार? हवामान खात्याने दिली 'ही' महत्वाची माहिती

रोहित कणसे

हवामान विभागाने शुक्रवारी परतीच्या मान्सूनबद्दल महत्वाची माहिती दिली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सून येत्या २५ सप्टेंबरच्या आसपास उत्तर पश्चिम भारतातून परत फिरण्याची शक्यता आहे.

सामान्यपणे नैऋत्य मान्सून एक जून रोजी केरळ येथे दाखल होतो आणि ८ जुलै पर्यंत संपूर्ण देशभरात पोहचतो. मान्सूनच्या परतीचा प्रवास १७ सप्टेंबरच्या आसपास उत्तर-पश्चिम भारतातून सुरू होता, जो १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होतो.

दरम्यान आयएमडीने सांगितले की, येत्या पाच दिवसांत उत्तर पश्चिम आणि जवळपास पश्चिम-मध्य भारतात कमी प्रमाणात पावसाच्या हलचाली होण्याची शक्यता आहे. मात्र २५ सप्टेंबरच्या जवळपास पश्चिम राजस्थानच्या काही भागांपासून नैऋत्य मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी अनुकूल स्थिती तयार होत आहे.

उत्तर-पश्चिम भारतात मान्सून परत फिरण्यास उशीर झाल्याचा परिणाम शेतीवर पाहायला मिळतो. मान्सूनच्या परतीचा प्रवास लांबल्याने देशात पावसाळा लांबतो आणि याचा थेट परिणाम शेतीवर होतो. विशेषतः उत्तर पश्चिम भारतात रबी पिकांसाठी मान्सू्च्या पावसाचे महत्व मोठे आहे. भारतात या मॉन्सून हंगामादरम्यान आतापर्यंत ७८०.३ मिलीमीटर पाऊस झाला आहेत, सामन्य ८३२.४ मिलीमीटर पाऊस होतो. दीर्घ कालावधीसाठी सरासरीच्या (LPA) ९४ टक्के ते १०६ टक्के दरम्यान पाऊस सामान्य मानला जातो.

साधारणपणे चार महिन्याच्या मॉन्सूनदरम्यान (जून ते सप्टेंबर) देशात सरासरी ८७० मिलीमीटर पाऊस होतो. दरम्यान मॉन्सून आगमनाच्या आधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आयएमडीने भारतात यंदा मॉन्सून सामान्य राहिल अशी शक्यता वर्तवली होती. तसेच 'अलनीनो' नैऋत्य मॉन्सूनला उत्तरार्धात प्रभावित करू शकतो असेही सांगण्यात आले होते. अलनीनो दक्षिण अमेरिकेच्या जवळ प्रशांत महासागरात पाण्याचे तापमान वाढण्याला म्हणतात. अलनीनो स्थितीमुळे भारतात मॉन्सून वारे कमकूवत होतात.

भारतात जूनमध्ये पावसाचे प्रमाण कमी होते, परंतु सततच्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे आणि मॅडेन-ज्युलियन ऑसिलेशन (MJO) च्या अनुकूलतेमुळे वायव्य भारतात जुलैमध्ये जास्त पाऊस झाला. एमजेओ हीएक मोठ्या प्रमाणात वातावरणातील गोंधळाची स्थिती (Atmospheric Turbulence) असतो जो उष्णकटिबंधीय आफ्रिकेतून उद्भवतो आणि पूर्वेकडे सरकतो, ज्याचा कालावधी सामान्यत: ३० ते ६० दिवसांचा असतो.

तसेच ऑगस्ट २०२३ हा १९०१नंतरचा सर्वात कोरडा महिना आणि भारतात आतापर्यंतचा सर्वात उष्ण महिना म्हणून नोंदवला गेला. अनेक कमी दाबाचा पट्टा आणि MJO च्या सकारात्मकतेमुळे सप्टेंबरमध्ये अधिक पाऊस झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Politics : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खळबळ! शहराध्यक्ष भगवान भालेराव यांची रिपब्लिकन आठवले पक्षातून हकालपट्टी

IND vs BAN: धावा नाही केल्या तरी काय झालं? Virat Kohli च्या नागीन डान्सवर चाहते खूश, पाहा व्हिडिओ

Bigg Boss Marathi 5: दोनच आठवड्यात Sangram Chougule यांनी घेतला बिग बॉसचा निरोप, कॅप्टन्सी टास्क पडला महागात

Sakal Maratha Samaj: सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मुंबईत दाखल; CM एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाला घालणार घेराव

सत्ताधारी-विरोधक राजकारणात व्यस्त; मुद्द्यापासून वेगळीकडे लक्ष वळवण्याचं काम सुरू, वरळीत राज ठाकरेंचं शरसंधान

SCROLL FOR NEXT