Moon Sakal
देश

Moon Mission: चंद्राची स्वारी भारी अवघड; बऱ्याचशा मोहिमा ठरतायत अयशस्वी; अंतराळात जाणं एवढं अवघड का?

२०१९ मध्ये सॉफ्ट लँडिग करण्यात अपयशी ठरल्यानंतर काही दिवसांपूर्वीच भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर स्वारी केली आणि ही चांद्रयान मोहिम यशस्वी करून दाखवली.

वैष्णवी कारंजकर

चंद्रावर जाण्याच्या अंतराळ मोहिमांसंदर्भात नुकत्याच दोन महत्त्वाच्या घटना घडल्या.या घटनांमुळे वैज्ञानिक आणि इतर लोकांनाही काही गोष्टींबद्दल विचार करण्यास भाग पाडलं आहे. २०१९ मध्ये सॉफ्ट लँडिग करण्यात अपयशी ठरल्यानंतर काही दिवसांपूर्वीच भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर स्वारी केली आणि ही चांद्रयान मोहिम यशस्वी करून दाखवली.

दुसरीकडे, या यशस्वी मोहिमेच्या अगदी काही दिवस आधी रशियाचं लुना २५ हे यान चंद्रावर पोहोचायच्या आधीच अयशस्वी ठरलं आणि क्रॅश झालं. या दोन्ही मोहिमांमध्ये गेल्या ६० वर्षांत झालेल्या मोहिमांची आठवण आली. या ६० वर्षांमध्ये चंद्राकडे कूच केलेल्या यानांपैकी अर्धीअधिक यानंच यशस्वी होऊ शकली. इतक्या वर्षांमध्ये झालेल्या या मोहिमा अपयशी का ठरल्या?

६० वर्षांपूर्वी झाली होती सुरुवात

पृथ्वीनंतर फक्त चंद्र हाच एक असा अवकाशातला भाग आहे, जिथे आत्तापर्यंत मानव पोहोचू शकला आहे. आत्तापर्यंत जगातले फक्त चारच देश चंद्रावर यशस्वी लँडिंग करू शकले आहेत. सुरुवातीला सोवियत संघाच्या लुना ९ ने फेब्रुवारी १९६६ मध्ये चांद्रयान मोहिम केली आणि त्यानंतर चारच महिन्यांनी अमेरिकेच्या सर्वेअर - १ ने चंद्रापर्यंतचं अंतर पार करून चंद्रावर लँडिंग केलं.

या दोन देशांनंतर चीन आणि भारताची स्वारी

या दोन्ही देशांनंतर चीनने २०१३ मध्ये आणि नंतर भारताच्या चांद्रयान ३ ने चंद्रावर पोहोचण्यात यश मिळवलं आहे. तर जपान, युएई, इस्राईल, रशिया, युरोपीय स्पेस एजन्सी, लक्झम्बर्ग, दक्षिण कोरिया आणि इटलीनेही चंद्रापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. चांद्रयान ३ च्या यशाच्या आधी रशियाचं लुना २५ हे यान चंद्रावर पोहोचण्याआधीच संपर्क तुटल्याने क्रॅश झालं.

२०१९ चे दोन अयशस्वी प्रयत्न

६० वर्षांपूर्वी सर्वात आधी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केलेल्या सोवियत संघापासून रशियापर्यंत मिळालेल्या अंतराळ मोहिमांमधल्या यशानंतरही लुना २५ यान अयशस्वी ठरलं. युक्रेन युद्धामुळे विविध प्रकारच्या आर्थिक संकटांमध्ये अडकलेल्या रशियाच्या या यानाला असं अपयश का मिळालं, या बद्दल काहीही माहिती नाही. २०१९ मध्येच चांद्रयान २ अयशस्वी झालं आणि त्याच्या शिवाय त्याच वर्षी इस्राईलचं बेरेशीट लँडरसुद्धा चंद्रावर गेलं आणि अयशस्वी झाल्याने तिथेच क्रॅश झालं.

अंतराळात जाणं अजूनही जोखमीचंच काम

अंतराळ मोहीमा आजही जोखमीच्याच आहेत. फक्त ५० टक्के मोहिमा यशस्वी होऊ शकल्या आहेत. एवढंच नव्हे तर छोट्या उपग्रह मोहिमा ज्या, पृथ्वीच्या कक्षेत पाठवल्या जात आहेत, त्याही विशेष यशस्वी झालेल्या नाहीत. त्यांच्या यशाची टक्केवारी ४० ते ७० टक्के इतकी आहे. मानवी मोहिमांची यशाची शक्यता ९८ टक्के आहे, कारण त्यामध्ये अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था असते. पण तरीही अनेक मानवी अंतराळ मोहिमांच्या अपयशावर विचार करायला हवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: चंदगड मतदारसंघात शिवाजी पाटीलआघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT