narendra modi 
देश

NDA Metting: जम्मू काश्मीरपेक्षाही जास्त अत्याचार केरळमध्ये.. मोदींनी केलं दाक्षिणात्य कार्यकर्त्यांचे कौतुक

More atrocities in Kerala said Modi: मोदींनी दक्षिणेतील कार्यकर्त्यांचं कौतुक केलं. तसेच, जम्मू-काश्मीरपेक्षा जास्त अत्याचार केरळमध्ये झालेले आहेत, असं मोदी म्हणाले.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड झाली आहे. यावेळी संसदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपने गेल्या काही वर्षात केलेल्या कामाबाबत भाष्य केलं. मोदींनी दक्षिणेतील कार्यकर्त्यांचं कौतुक केलं. तसेच, जम्मू-काश्मीरपेक्षा जास्त अत्याचार केरळमध्ये झालेले आहेत, असं मोदी म्हणाले.

दक्षिणेमध्ये एनडीएने एका नव्या राजकारणाचा पाया रोवला आहे. कर्नाटक आणि तेलंगणामध्ये लोकांनी एनडीएला पसंती दिली आहे. तमिळनाडूच्या टीमचे मी अभिनंदन करतो. त्यांनी जीव तोडून काम केलं. जागा जिंकलो नाही, पण एनडीएला मिळाल्या मतामध्ये मोठी वाढ झाली आहे. केरळमध्ये आमच्या शेकडो कार्यकर्त्यांचं बलिदान गेलं आहे, असं मोदी म्हणाले.

केरळमध्ये एका विचारधारेच्या लोकांवर झालेले अत्याचार भयंकर आहेत. मला वाटतं जम्मू-काश्मीरपेक्षा जास्त अत्याचार तिथे झाले आहेत. विजय कुठेही दिसत नव्हता तरी कार्यकर्ते मागे हटले नाहीत. आज पहिल्यांदा तिथे आमचा प्रतिनिधी निवडून आला आहे. ही मोठी उपलब्धी आहे, असं मोदी म्हणाले.

आंध्र प्रदेशमध्ये एनडीएने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. इथे बसलेले पवन कल्याण हे पवन नाहीत तर ते एक वादळ आहेत. आंध्रच्या लोकांनी आमच्या बाजूने प्रचंड मतं दिली आहेत, असं मोदी म्हणाले. मोदींनी यावेळी ओडिशाचा देखील उल्लेख केला. गरिबांचे देवता जगन्नाथ यांनी आमच्या बाजूने कौल दिला आहे, असंही ते म्हणाले.

ईव्हीएच्या मुद्द्यावरुन विरोधक आता शांत झाले आहेत. निवडणूक आयोगाच्या कामात अडथळा यावा यासाठी त्यांनी वारंवार कोर्टाचे दरवाजे ठोठावले. त्यामुळे निवडणूक आयोगाची शक्ती मोठ्या प्रमाणात यात खर्च झाली. विरोधकांना जगामध्ये देशाचं नाव खराब करायचं होतं, त्यामुळे त्याचं हे काम सुरु होतं.पण, आता पुढील पाच वर्षे ईव्हीएमवर विरोधक बोलणार नाहीत, असं मोदी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar यांच्यावर टीका का करत नाही? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मी विचलित...'

Health Tips :  शरीरातील बॅड कोलोस्टेरॉल कमी करायचा आयुर्वेदीक फंडा, भाकरी करण्याआधी इतकच करा

'वक्फ बोर्डाच्या नावाखाली राज्यातील शांतता भंग केल्यास कठोर कारवाई करणार'; गृहमंत्र्यांचा कडक इशारा

बॉक्सर Mike Tyson अन् जॅक पॉलवर कोटींचा वर्षाव; जाणून घ्या संपत्ती किती ?

Swiggy-Zomato: स्विगी, झोमॅटो आणि झेप्टोबाबत देशातील बड्या उद्योगपतीचा इशारा, म्हणाले, भारत हा...

SCROLL FOR NEXT