bsp sakal
देश

Defection of MPs : बसपच्या अर्ध्याअधिक खासदारांचे पक्षांतर

उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाच्या (बसप) अर्ध्याअधिक खासदारांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी दुसऱ्या पक्षात जाणे पसंत केले आहे.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाच्या (बसप) अर्ध्याअधिक खासदारांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी दुसऱ्या पक्षात जाणे पसंत केले आहे. आतापर्यंत सात खासदारांनी आपल्या निष्ठा बदलल्या आहेत.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत बसपचा एकही खासदार निवडून आला नव्हता. परंतु २०१९ च्या निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या (सप) आणि बसप या पक्षांची आघाडी झाली होती. यात बसपाचे दहा खासदार निवडून आले होते. परंतु या खासदारांपैकी आतापर्यंत सात खासदारांनी एकतर दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आहे किंवा पक्षांतराचे संकेत दिले आहेत.

आंबेडकरनगर लोकसभा मतदारसंघाचे बसपचे खासदार रितेश पांडे यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचे वडील राकेश पांडे हे सपचे आमदार आहेत. परंतु आंबेडकरनगर मतदारसंघात सपने लालजी वर्मा यांची उमेदवारी घोषित केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी रितेश पांडे यांनी भाजपला जवळ केले.

दानिश काँग्रेसमध्ये

भाजप खासदार रमेश बिधुडी यांच्या वक्तव्यानंतर चर्चेत आलेले अमरोहाचे बसपचे खासदार दानिश अली काँग्रेसमध्ये जाणार आहेत. ते भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. याशिवाय बसपचे आणखी काही खासदार हे भाजपच्या वाटेवर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT