देश

प्रतिमा नव्हे,जीव महत्त्वाचे;अनुपम खेर यांची केंद्रावर टीका

नामदेव कुंभार

Corona pandemic : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचं गुणगान गाणारे अनुपम खेर (Anupam Kher) यांनी अप्रत्यक्षरित्या निशाना साधला आहे. प्रतिमा सुधारण्यापेक्षा अथवा संवर्धनापेक्षाही आयुष्यात आणखी बरंच काही महत्त्वाचं असतं, असं अनुपम खेर (Anupam Kher) यांनी म्हटलं आहे. बुधवारी ते NDTV ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. अनुपम खेर म्हणाले की, 'मला वाटतेय की कोरोना संकटात केंद्र सरकारनं काही ठिकाणी चूक केली आहे. यासाठी त्यांना जबाबदारही धरावं लागेल. केंद्र सरकारवर (modi govt) सध्याची होणारी टीका बऱ्याच उदाहरणांमध्ये सत्य आहे. सध्या सरकारने प्रतिमा संवर्धन करण्यापेक्षा दुसरंही काही महत्त्वाचं आहे, हे समजून घेण्याची गरज आहे.'

सध्याच्या घडीला सरकारवर होत असलेली टीका बऱ्याच उदाहरणांमध्ये सत्य आहे. ज्यांनी निवडून दिलेय त्यांच्यासाठी काम करण्याची सध्या नितांत गरज आहे. ज्या कामासाठी निवडून देण्यात आलेले आहे ते काम सरकारने करायला हवं. कोरोना काळात काही ठिकाणी सरकारनं चूक केली . त्यामुळे त्यांना यामध्ये जबाबदार धरायला हवं. मात्र, याच गोष्टीचं समोरच्या पक्षाने भांडवल करणंसुद्धा चुकीचं आहे, असं 66 वर्षीय अनुपम खेर (Anupam Kher) म्हणाले.

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये मृतदेह नदीमध्ये तरंगत असल्याचं दिसतंय. मानवी मन नसलेली व्यक्तीच अशा घटना पाहून दु:खी होणार नाहीत. सध्याच्या घडीला मोदी सरकारनं प्रतिमा सुधारण्यापेक्षा दुसरंही खूप महत्त्वाचं आहे, हे समजून घेण्याची गरज आहे, असा खोचक सल्ला खेर (Anupam Kher) यांनी मोदी सरकारला दिलाय.

दरम्यान, दोन दिवसांपासून 'येणार तर मोदीच' अशी कमेंट केल्यामुळे अभिनेते अनुपम खेर यांना टीकेचा सामना करावा लागला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात हाहाकार माजवलाय. आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडालाय. रुग्णालयात बेड, ऑक्सिजन आणि गौळ्या औषधांचा तुटवडा पडलाय. कोरोनाच्या या लढ्यात अनुपम खेर यांनीही मदतीचा हात पुढे केलाय. कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी आवश्यक वैद्यकिय उपकरणांची मदत ते रुग्णालयांना करत आहेत. देशातील विविध रुग्णालयांना ऑक्सिजन कंसंट्रेटर्स, व्हेंटिलेटर्स पुरवण्याची व्यवस्था ते करत आहेत. 'प्रॉजेक्ट हिल इंडिया'च्या माध्यमातून विनामूल्य ही मदत केली जात आहे. अनुपम खेर फाऊंडेशनने अमेरिकेच्या 'ग्लोबल कॅन्सर फाऊंडेशन' आणि देशातील 'भारत फोर्ज' यांच्या माध्यमातून हे काम हाती घेतलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेणार

Mahad Assembly Election 2024 result live : महाड विधानसभेत भरत गोगावलेंची सरशी ! ठाकरे गटाच्या स्नेहल जगतापांचा दणदणीत पराभव

Konkan Region Assembly Election Result 2024: राणे बंधूंनी तळकोकण राखले; भास्कर जाधव यांनी थोडक्यात गुहागर जिंकले

Sanjay Gaikwad won Buldana Vidhan Sabha: दोन शिवसेनेत कडवी झुंज! संजय गायकवाडांचा निसटता विजय, उद्धवसेनेच्या जयश्रींनीची तगडी फाईट

SCROLL FOR NEXT