RSS 
देश

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेवेळी मशीद, मदरशांमधून इबादत करा; RSS नेत्याचं आवाहन

आरएसएसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आणि मुस्लिम राष्ट्रीय मंचचे मुख्य संरक्षक इंद्रेश कुमार यांनी २२ जानेवारी रोजी एक महत्त्वाचं आवाहन केले आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- आरएसएसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आणि मुस्लिम राष्ट्रीय मंचचे मुख्य संरक्षक इंद्रेश कुमार यांनी २२ जानेवारी रोजी एक महत्त्वाचं आवाहन केले आहे. २२ जानेवारीला अयोध्येत राम लल्लाची प्रतिष्ठापणा होत असताना सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत मशीद, मदरसे, दर्जा याठिकाणांहून देशाच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाटी आणि सौहार्दासाठी इबादत करावी असं ते म्हणाले आहेत. (mosques and madrassas should pray on 22 January ram mandir day said rss indresh kumar)

आकाशवाणीच्या रंगभवनमध्ये 'राम मंदिर- राष्ट्र मंदिर- एस साझी विरासत: कुछ अनसुनी बाते' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी इंद्रेश कुमार बोलत होते. २२ जानेवारीला रात्रीच्या वेळी अशा ठिकाणी दिवे लावावे असंही ते म्हणाले आहेत. २२ जानेवारी रोजी संपूर्ण देशात दिवाळी साजरे करा. घरोघरी दिवे लावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केलं होतं.

इंद्रेश कुमार म्हणाले की, सगळ्यांचा डीएनए सारखाच आहे. नॅशनल कॉन्फरेन्सचे नेते फारुख अब्दुल्ला म्हणतात की राम फक्त हिंदूचे नाहीत, तर सर्वांचे आहेत. आम्ही हे नाकारलं नाही. फारुख यांनी आयएनडीआयएला सांगावं की इबादत कण्यासाठी कोणत्या निमंत्रणाची गरज नाही. मुस्लिम राष्ट्रीय मंचचे कार्यकर्ता ६ ते १५ दिवसांपर्यंत पदयात्रा करत अयोध्येमध्ये येतील.

रामाची आपल्याला गरज

केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मगद यांनी देखील याबाबत भाष्य केलं. ते म्हणाले की, मर्यादा पुरुषोत्तम रामाची भारताला आवश्यकता आहे. येणाऱ्या पिढीने रामाला जाणून घेणे महत्त्वाचे आहे. मानव हा केवळ सामाजिक प्राणी नाही, तर तो महत्वाकांक्षी व्यक्ती आहे. त्याच्यासमोर आदर्श नसतील तर तो अनिर्बंध होईल. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

Bandra East Assembly Constituency Results: 'मातोश्री'च्या अंगणात पुन्हा शिवसेना? वरुण सरदेसाई यांनी मारली मुसंडी; झिशान सिद्दीकी पिछाडीवर

SCROLL FOR NEXT