love Marriage Esakal
देश

Supreme Court : लव्ह मॅरेजमध्येच होतात सर्वाधिक घटस्फोट! सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

न्यायमूर्ती बी. आर. गवई यांनी हे मत मांडले.

सकाळ डिजिटल टीम

लव्ह मॅरेजमधूनच सर्वाधिक घटस्फोटाची प्रकरणे समोर येतात, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि संजय कारोल यांच्या खंडपीठासमोर एका प्रकरणाची सुनावणी सुरू असताना गवई यांनी हे मत मांडले.

काय आहे प्रकरण?

सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर एका वैवाहिक विवादाच्या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. यावेळी संबंधित दाम्पत्याचा विवाह हा लव्ह मॅरेज असल्याचे कोर्टासमोर सांगण्यात आले. यावर प्रतिक्रिया देताना जस्टिस गवई यांनी 'लव्ह मॅरेजमधूनच घटस्फोटांची सर्वाधिक प्रकरणे समोर येत आहेत' अशी टिप्पणी केली.

दरम्यान, या खटल्यामध्ये कोर्टाने मध्यस्थी करण्याचा पर्याय सुचवला. मात्र पतीला हा निर्णय मान्य नव्हता. त्यानंतर नुकत्याच दिलेल्या एका निकालाच्या पार्श्वभूमीवर पतीच्या परवागनीशिवाय घटस्फोट दिला जाऊ शकतो, असं मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केलं. त्यानंतर दोन्ही बाजूंना मध्यस्थी करण्याचे आवाहन या खंडपीठाने केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Private Property Rights: खाजगी मालमत्ताधारकांच्या हक्कांना मिळाला मजबूत आधार ; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकर CSK च्या जर्सीत दिसणार? मुंबई इंडियन्सच नव्हे, तर चार तगडे संघ बोली लावणार

Nashik Vidhan Sabha Election: विधानसभेत महायुतीला 175 जागा मिळणार; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची पत्रकार परिषदेत माहिती

Diwali Weekend Hotel Spike : शहर निघाले हॉटेलिंगला..! चार दिवसांत ३ ते ४ कोटींची उलाढाल, सुट्यांमध्ये गाठणार ९ कोटींचा टप्पा

Heena Gavit : भाजपला विधानसभेच्या तोंडावर मोठा झटका! माजी खासदाराचा पक्षाला रामराम; विधानसभेच्या मैदानात अपक्ष लढणार

SCROLL FOR NEXT