oxygen storage in nashik e-sakal
देश

बहुतांश राज्यात ऑक्सिजनअभावी मृत्यू नाहीत; आरोग्य मंत्रालयाकडे माहिती

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आपल्या राज्यात एकाही कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झालेला नाही, असे देशातील २८ राज्यांपैकी उत्तर प्रदेशासह १७ राज्य सरकारांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला कळविले आहे. तर, महाराष्ट्र व दिल्लीने १३ ऑगस्टपर्यंतच्या मुदतीत आपले उत्तर कळविलेले नसल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले. दरम्यान, कोरोना काळात केंद्राने कोरोना मृत्यूंचे रोजचे आकडे दिल्लीला पाठविण्याची राज्यांना सूचना केली, तेव्हा ऑक्सिजनअभावी झालेल्या मृत्यूची वेगळा आकडेवारी देण्यास सांगितले होते काय? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. परंतु आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, अशी वेगळी माहिती मागविलेली नव्हती.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिलमध्ये देशभरात ऑक्सिजनची भीषण टंचाई उद्भवली होती. केंद्राकडून ऑक्सिजन मिळत नसल्याची तक्रार अनेक राज्यांनी केली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घेऊन केंद्राला कानपिचक्या दिल्या होत्या. त्यानंतर ऑक्सिजनचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. जगभरातील माध्यमांनीही दखल घेतली होती. या पार्श्वभूमीवर राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात मोदी सरकारने म्हटले होते की, देशात ऑक्सिजनअभावी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला, असे राज्यांनी कळविलेले नाही. यामुळे गदारोळ झाला होता. त्यानंतर आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकारांना पत्र पाठवून, तुमच्या राज्यांत किती कोरोनाग्रस्तांचा ऑक्सिजनमुळे मृत्यू झाला हे १३ ऑगस्टपर्यंत कळवा असे सांगितले होते.

देशातील १७ राज्ये अशी

१६ ऑगस्टपर्यंत राज्यांनी पाठविलेली माहिती उपलब्ध ‘सकाळ’कडे आहे. यानुसार गोवा, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, नागालॅंड, छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, आसाम, ओडिशा, जम्मू-काश्मीर, लद्दाख, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, अंदमान-निकोबार या राज्यांनी व केंद्रशासित प्रदेशांनी एकही मृत्यू ऑक्सिजनअभावी झालेला नाही (निल) असे केंद्राला कळविले आहे.

आंध्र प्रदेश: श्री वेंकटेश्वर रामनारायणरूईया रूग्णालयात व्हेटिलेटरवर असलेल्या काही रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजन पुरवठ्यातील व्यत्ययामुळे झाला असावा, असे प्राथमिक चौकशीत दिसले, मात्र हा अंतिम निष्कर्ष नाही असे म्हटले आहे.

कर्नाटक: चामराजनगर जिल्हा रूग्णालयातील कोरोना अतिदक्षता विभागातील २४ रुग्णांचा २ व ३ मे रोजी मृत्यू झाला. त्याच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी ए पाटील यांची समिती राज्य सरकारने नेमली असून या समितीच्या अहवालाची प्रतीक्षा आहे, असे म्हटले आहे.

पंजाब: ४ रुग्णांचा मृत्यू ऑॅक्सिजनअभावी झाल्याचा संशय आहे, मात्र याबाबत ठोस माहिती सांगता येणार नाही.

छत्तीसगड: ऑक्सिजन कमतरतेमुळे कोणाचाही मृत्यू झाला नसला तरी हे खरे आहे की भिलाईच्या पोलाद प्रकल्पातून दुसऱ्या राज्यांमध्ये तातडीने ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला.

दिल्ली: दिल्लीत ऑक्सिजनअभावी झालेल्या मृत्यूमुळे सारा देश हादरला होता. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी म्हटले आहे, की राज्य सरकारला आधी चौकशी करू द्या. सरकारने याबाबत नेमलेली चौकशी समिती नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी रद्द केली. त्यांच्याकडे आम्ही दुसऱ्यांदा परवानगी मागितली आहे तेव्हा ती रद्द करू नका, असे माध्यमांनीच नायब राज्यपालांना सांगावे, असेही सिसोदिया म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “आजही तो कुटुंबासाठी काही बोलत नाही….”; सांगता सभेत अजित पवारांच्या आईचं पत्र दाखवलं वाचून

Sports Bulletin 18th November: गौतम गंभीरला हाय कोर्टाकडून दिलासा ते चेतेश्वर पुजारावर बॉर्डर-गावस्कर मालिकेत नवी जबाबदारी

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Champions Trophy पाकिस्तानमध्येच होणार, मागे हटणार नाही! PCB प्रमुखांचं रोखठोक मत; पाहा Video

Latest Maharashtra News Updates : सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

SCROLL FOR NEXT