mother and daughter fight back against two armed robbers who enter their residence to rob Video goes Viral  
देश

Mother-Daughter Fight Back Video : घरात घुसलेल्या दोन हत्यारबंद चोरांना माय-लेकींनी चांगलचं धुतलं! घटनेचा Video Viral

रोहित कणसे

Mother-Daughter Fight Back Video : नारी शक्ती बद्दल आपण बऱ्याचदा बोलत असतो, याचा प्रत्येय नुकतेच हैदराबाद येथे पाहायाला मिळाला. येथे मायलेकीने मिळून दाखवलेल्या हिमतीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. मार्शल आर्टचं प्रशिक्षण घेतलेल्या या मायलेकीनी घरात घुसलेल्या हत्यारबंद चोरांना पळवून लावलं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही आरोपी हे उत्तर प्रदेशच्या कानपूर येथील रहिवासी आहेत.

या घटनेच्या आधी दोन्ही आरोपींनी परिसरात रेकी करून घर निवडलं. त्यांच्या प्लॅननुसार आरोपी गुरूवारी दुपारी एक वाजत कुरीयर डिलीव्हरी एजेंट बनून त्या घरात गेले. पण घराची मालकीन अमिता महनोत धरीच होत्या. घरात काम करणारी महिला कुरीयर घ्यायला गेली असता चेहरे लपवलेले दोघे आरोपी जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने जबरदस्ती घरात घुसले.

एका आरोपीने स्वयंपाक घरात जाऊन मोलकरणीच्या गळ्यावर चाकू ठेवून धमकी दिली. यादरम्यान अमिता यांच्या अल्पवयीन मुलीने दुसऱअया आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला. या दोघांमध्ये झटापट सुरू असताना ४६ वर्षीय अमिता देखील आपल्या मुलीला साथ देऊ लागल्या आणि बघता बघात या मायलेकींनी त्या दोन आरोपींचा चोरीचा प्रयत्न हाणून पाडला.

या भांडणादरम्यान आरोपीने आपल्या बॅगेतून देसी कट्टा काढला. पण मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेतलेल्या अमिता यांनी त्याला लाथ मारली आणि कट्टा हातातून हिसकावून घेतला. अमिता यांनी आरोपीवर लाथा-बुक्क्यांनी हल्ला चढवला यादरम्यान आरोपी पळून गेला. दुसरीकडे किचनमधील दुसऱ्या आरोपीला बाहेर सुरू असलेल्या प्रकाराबद्दल माहिती नव्हती. घरातील गोंधळ ऐकून शेजारी तेथे आले आणि त्यांनी दुसऱ्या चोराला पकडून पोलीसांच्या हवाली केले. यानंतर पोलीसांनी पळून गेलेल्या आरोपीला देखील ताब्यात घेतलं. पोलीसांनी देखील आई आणि मुलीच्या धाडसाचं कौतुक केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT