Mother's Day 2023 esakal
देश

Mother's Day 2023 : आईला द्या आज ही खास भेट, तिच्यासाठी उघडा MSSC खातं, आहेत फायदेच फायदे

आता हे खाते कसले? याचा उपयोग आणि फायदा काय याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

Mother's Day 2023 : मातेचं महत्व मातृदिनाच्या निमित्ताने आज जगभर लिहीलं वाचंल आणि ऐकलं जातं. कारण दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात १४ मे ला मातृदिन असतो. खरं तर आईचं महत्व अनन्यसाधारण आहे. तिला मातृदिनाच्या दिवशी काही तरी हटके भेट तुम्ही देऊ इच्छित असाल तर या भेटीपेक्षा उत्तम दुसरी कुठली भेट ठरूच शकणार नाही. तुमच्या आईसाठी आज MSSC चे खाते उघडा. आता हे खाते कसले? याचा उपयोग आणि फायदा काय याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

देशातील महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात महिला सन्मान बचत पत्र योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत खाते उघडून तुम्ही मदर्स डेच्या खास प्रसंगी तुमच्या आईला खास भेट देऊ शकता.

देशातील प्रत्येक महिला या योजनेत गुंतवणूक करू शकते आणि यासाठी कोणतीही वयोमर्यादा निश्चित केलेली नाही. ही योजना मुदत ठेव योजनेसारखी (Fix Deposit Scheme) आहे ज्यामध्ये तुम्ही एकूण दोन वर्षांसाठी पैसे गुंतवू शकता.या योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या आईसाठी जास्तीत जास्त 2 लाख रुपये गुंतवू शकता.

या योजनेत गुंतवणूक केल्यावर, आयकराच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत सूट मिळते.योजनेवर मिळालेल्या व्याजाबद्दल बोलायचे झाल्यास ते 7.5 टक्के आहे. जर तुम्ही तुमच्या आईसाठी मे २०२३ मध्ये या योजनेत खाते उघडले तर योजनेची मॅच्युरिटी मे २०२५ मध्ये होईल. (Mothers Day)

या योजनेअंतर्गत तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत खाते उघडू शकता. अलीकडेच केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी संसद मार्गावरील पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन 'महिला सन्मान बचत प्रमाणपत्र' योजनेअंतर्गत खाते उघडले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT