Mother's Day sakal
देश

Mother's Day : आई-वडील वेगळे झाल्यानंतर 'या' खास व्यक्तीने दिले रतन टाटांना संस्काराचे धडे

रतन टाटा यांचे बालपण फारसे चांगले गेले नाही याचं एकमेव कारण होत त्यांच्या आईवडिलांमध्ये मतभेद.

निकिता जंगले

Mother's Day : प्रसिद्ध बिझिनेसमॅन रतन टाटा यांना कोण ओळखत नाही. व्यावसायिक क्षेत्रात नावाजलेलं नाव असलेले रतन टाटा यांनी देशात औद्योगिक क्रांती घडवून आणली.देशाच्या औद्योगिक क्षेत्रात त्यांचा मोलाचा वाटा आहे पण असं म्हणतात ना की यशस्वी लोकांच्या वाटेला कधी संघर्ष चुकलेला नाही.असाच संघर्ष रतन टाटा यांच्या आयुष्यातही होता. त्यांचे बालपण फारसे चांगले गेले नाही याचं एकमेव कारण होत त्यांच्या आईवडिलांमध्ये मतभेद.

याच मतभेदामुळे त्यांचे आईवडिल वेगवेगळे राहायला लागले त्यामुळे त्यांना जन्म देणाऱ्या आईच्या मायेपासून नेहमीच वंचित राहावं लागलं पण त्याचं संगोपण एका खास व्यक्तीनं केलं. आज आपण मातृदिनविशेष मालिकेत या अनोख्या मायलेकराच्या नात्याची कहानी जाणून घेणार आहोत. (Mothers day special businessman ratan tata shared special bond with his grandmother)

रतन टाटा हे १० वर्षांचे होते, जेव्हा त्यांचे आई-वडील वेगळे झाले, त्यानंतर त्यांचे संगोपन हे त्यांच्या आजीने म्हणजेच नवाजबाई यांनी केले.आज रतन टाटा हे देशातील प्रतिष्ठीत व्यक्तिंमध्ये गणले जातात. त्यांची विचारसरणी ही अनन्यसाधारण आहे.

योग्य निर्णय घेण्यापेक्षा घेतलेले निर्णय योग्य असल्याचे सिद्ध करण्यावर टाटा यांचा नेहमी विश्वास राहला. व्यक्तीच्या विचारांपेक्षा तिचा दुसरा कोणताही शत्रू असू शकत नाही. त्यामुळे विचार उत्तम दर्जाचे असावे, असा त्यांचा आग्रह आहे.

त्यांच्या विचारसरणीतून कायम त्यांच्यावर झालेले संस्कारांची वेळोवेळी जाणीव होते. आई नसताना आजीने केलेले प्रेम, दाखवलेली माय, शिकवलेले चांगले संस्कार आजही वयाच्या ८५ व्या वर्षी रतन टाटांच्या व्यक्तिमतत्वातून दिसून येते.

टाटांच्या या विचारसरणीमुळेच त्यांनी आयुष्यात अनेक धाडसी निर्णय घेतले, नवकल्पना राबवल्या आणि याच्याच बळावर पैसा प्रतिष्ठा कमवली.यात त्यांच्या आई म्हणजेच आजी नवाजबाई यांचा मोठा खारीचा वाटा आहे.

आर्किटेक्चर आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग केली. रतन टाटा यांनी वयाच्या 25 व्या वर्षी कंपनीत आपले करिअर सुरू केले. त्यांची पहिली नोकरी त्यांनी जमशेदपूरमधील टाटा स्टील विभागात केली. हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून मॅनेजमेंटचाही कोर्स केला. 1991 मध्ये ते टाटा समूहाचे अध्यक्ष झाले.

टाटांनी मोठा अविष्कार करत पहिली स्वदेशी पहिले स्वदेशी टाटा इंडिका चार चाकी वाहन बनविले.जवळपास तीस कंपन्यांचे ते मालक असून कोटींची संपत्ती त्यांच्याजवळ आहे पण एवढ सगळं असतानाही ते कधीच नम्रपणा आणि साधेपणा विसरले नाही.हीच त्यांच्या आईची शिकवण आहे ज्यामुळे लाखो युवक त्यांना आपला आदर्श मानतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

SCROLL FOR NEXT