Mother's Day : एक स्त्री जेव्हा आई होते तेव्हा ती सर्व दु:ख ,वेदना पचवायला सक्षम राहते. मुलांच्या भविष्याचा विचार करताना ती स्वत:च्या सुखाचा कधीही विचार करत नाही आणि आपल्या मुलांसाठी वाट्टेल ते करण्यास एवढंच काय तर अख्ख्या जगाशी लढण्यात तयार राहते.
आज आपण मातृदिन विशेष मालिकेत अशा आईचा संघर्ष बघणार आहोत जिच्या आयुष्यात वारंवार दु:खाचा डोंगर कोसळला पण ती कधीच डगमगली नाही आणि आपल्या मुलांना कठीण परिस्थितीतही चांगली शिकवण देत लहानाचं मोठं केलं. आज आपण राजकारणापलीकडे सोनिया गांधींची आई म्हणून अनोखी संघर्षमय कहानी जाणून घेणार आहोत. (Mothers Day special congress leader Sonia Gandhi rahul gandhi Priyanka Gandhi mother son daughter relationship )
सोनिया गांधी इटलीच्या. त्यांचा जन्म इटलीच्या मारोस्टिकामध्ये झाला होता. आईवडिलांची आर्थिक परिस्थिती तितकी चांगली नव्हती. सोनियांनी वयाच्या १३ व्या वर्षी शालेय शिक्षण पूर्ण केले. फ्लाईट अटेंडंट होण्याची सोनिया यांची इच्छा कुटूंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे पूर्ण होऊ शकली नाही.
1964 मध्ये त्या केंब्रिज शहरात बेल एजुकेशनल ट्रस्टच्या भाषा शाळेत इंग्रजी शिकण्यासाठी गेल्या. पुढच्या वर्षी त्या वर्सीटी रेस्टॉरंटमध्ये पार्टटाईम वेट्रेस म्हणून काम करु लागल्या. इथेच त्यांची राजीव गांधींशी भेट झाली. ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि पुढे १९६८ ला ते लग्नबंधनात अडकले आणि सोनिया गांधी भारतात आल्या.
आपण भारतातल्या एका मोठ्या राजकीय घराण्यातील सुन होणार आहोत, याची पूर्वकल्पना त्यांना होतीच. राजीव गांधीनी कधीच राजकारणात उतरू नये, असे त्यांना मनोमनी वाटायचं.
एका वेगळ्या देशात, वेगळ्या वातावरणात, राजकीय घराण्यातील सुन म्हणून स्वत: ला अॅडजस्ट करणं, हे खरोखरंच सोनिया गांधींसाठी खूप मोठं आव्हान होतं. सोनिया गांधीने १९७० ला राहूल गांधीला आणि १९७२ला प्रियंकाला जन्म दिला आणि त्या दोन लेकरांच्या आई झाल्या. जबाबदारी वाढली होती.
१९८० ला संजय गांधींचे अपघाती निधन त्यानंतर १९८४ मध्ये इंदिरा गांधींची हत्या या सर्व घटनेने आधीच सोनिया गांधी हादरल्या होत्या.त्यांना इंदिरा गांधीच्या निधनानंतर राजकारण नकोसं वाटत होतं पण जेव्हा इंदिरा गांधीच्या निधनानंतर राजीव गांधी राजकारणात सक्रीय झाले तेव्हा त्यांच्या मनात कायम धास्ती असायची आणि ज्याची भीती होती तेच झालं.
१९९१ हे वर्ष गांधी कुटूंबासाठी काळ वर्ष म्हणावं लागेल. २१ मे १९९१ ला त्यांची हत्या करण्यात आली आहे आणि येथूनच सोनिया गांधींचा खरा संघर्ष सुरू झाला.
दोन लेकराची आई, ज्याच्यासाठी या देशात आले तो व्यक्ती हयात नाही, ते संपुर्ण कुटूंब नाहीसं झालंय, पक्ष रस्त्यावर आलाय, या सर्व गोष्टींची घालमेल नक्कीच त्यावेळी सोनिया गांधीच्या मनात होत असेल पण त्यांनी स्वत:ला सावरलं. मुलांसाठी त्या खंबीर बनल्या. संघर्ष स्वीकारला आणि मुलांना घडवलं.
राजीव गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेस दिवसेंदिवस मागं येत होतं. कॉंग्रेसला एका चांगल्या नेतृत्वाची गरज होती. यामुळे राजीव गांधी यांच्या हत्येनंतर ७ वर्षांनी १९९८ साली सोनिया गांधींनी काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारले. राजीव गांधींनांही राजकारणात जाऊ नका, अशा सातत्याने म्हणणाऱ्या सोनिया गांधींना राजकारणात उतरावं लागलं.
२०१७ सालापर्यंत २२ वर्षे इतका काळ त्यांनी अध्यक्षपद सांभाळले. त्यानंतर पुढे २०१९ साली राहुल गांधींनी राजीनामा दिल्यानंतर त्या परत अध्यक्ष बनल्या.
त्यांच्या राजकीय कारकिर्दीदरम्यान त्यांच्या परदेशात जन्माच्या मुद्द्यावरून त्यांना नेहमी टीकेला सामोरे जावे लागले पण त्या डगमगता उभ्या राहल्या. त्या अनेक सल्लागार समितींच्या अध्यक्षस्थानी होत्या.
एवढंच काय तर अनेकदा सोनिया गांधींचा जगातील सर्वात जास्त शक्तिशाली महिलांमध्ये समावेश करण्यात आलाय. आज त्यांच्या कष्टाचे, संघर्षाचे बीज आपल्याला राहूल गांधी आणि प्रियंका गांधींच्या रुपात दिसून येते.
सोनिया गांधींनी त्यांच्या शिकवणीतून देशाचं प्रतिनिधित्व करण्यास सक्षम असणाऱ्या व्यक्तिला घडवले. राहूल गांधी आणि प्रियंका गांधींना चांगली शिकवण दिली.
आपल्या भारतीय संस्कृतीत नवरा गेल्यानंतर एका स्त्रिला एकटं आयुष्य जगणे खूप कठीण जातं. तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो पण सोनिया गांधी फक्त जगल्याच नाही तर लढल्या, संघर्ष केला,अडचणीतून मार्ग काढला आणि नाहिसे झालेल्या गांधी कुटूंबाला एक नवी दिशा दिली. काँग्रेसची धुरा सांभाळली. त्यांच्या नेतृत्वात सत्तेत असताना त्यांनी देशही सांभाळला पण या दरम्यान त्या आई म्हणून नेहमी अव्वल राहल्या आजच त्यांच्याच पावलांवर पाय ठेवत राहूल गांधी आणि प्रियंका गांधी राजकारणात सक्रिय आहे.
.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.