Mother's Day : आई हे जगातलं खूप सुंदर नातं आहे. आई ही आपल्या मुलाच्या जीवनाला आकार देण्याचं, मुलाला घडविण्याचं काम करते. आज आपण अशाच मायलेकाविषयी जाणून घेणार आहोत ज्यांचं प्रेम वयानुसार आणखी वाढताना सर्वांनी बघितलं.
होय, आज आपण मातृदिनविशेष मालिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची आई हिराबेन यांच्या अनोख्या आणि खास नात्याविषयी जाणून घेणार आहोत. (Mothers Day special pm Narendra Modi and his mother Heeraben mother son relationship)
मागील वर्षी डिसेंबरमध्ये नरेंद्र मोदी यांच्या आईचं वृद्धापकाळ आणि प्रदीर्घ आजाराने निधन झालं. तरीसुद्धा इतक्या वर्षांमध्ये त्यांचे आईविषयीचे प्रेम अख्ख्या जगाने पाहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत असतात.त्यापैकी एक गोष्ट होती त्यांचे आणि त्यांच्या आईचे नाते.
कितीही बिझी असले तरी नरेंद्र मोदी आपल्या आईला वेळ द्यायचे.त्यांच्यासोबत गप्पा मारायचे, त्यांच्यासोबत जेवणाचा आस्वाद घ्यायचे. मोदींनी अनेकदा आपल्या मुलाखतीतून,भाषणातून त्यांच्या आयुष्यातील आईचं महत्त्व वेळोवेळी सांगितलं.
मोदींनी आपल्या एका ब्लॉगमध्ये लिहताना सांगितले होते की आईने सांगितलेल्या एका गोष्टीने माझे संपुर्ण आयुष्य बदलले.तिने सांगितले होते की काम नेहमी बुध्दीने आणि जीवन नेहमी शुध्दीनं जगायचं. या गोष्टीचा त्यांच्या जीवनावर खोलवर परिणाम झाल्याचे मोदी त्यांनी लिहिलेल्या ब्लॉगमध्ये सांगतात.
मोदींनी त्याच ब्लॉगमध्ये त्यांच्या आईविषयी आणि तिच्या संघर्षाविषयीही सांगितले होते. मोदी सांगतात की माझी आई जितकी साधी दिसते तितकीच असामान्य आहे.तिने तिच्या आयुष्याच बरीच कष्ट केले आणि संघर्ष बघितला.
लहानपणीच तिने आई गमावली. ती आईविना पोरकी होती. पुढे घर आणि आम्हा भावंडाचा खर्च भागवण्यासाठी ती इतरांच्या घरात धुणीभांडी सुद्धा करायची. तीने खूप कष्टमय जीवन जगले.
नरेंद्र मोदी्ंना त्यांच्या आईविषयी नितांत आदर आहे. आईने जगलेला संघर्ष त्यांनी खूप जवळून बघितला होता. त्यामुळे आई हयात असताना त्यांनी आईची खूप सेवा केली. वेळ काढून ते आईला भेटायचे. तिच्यासोबत वेळ घालवायचे.
मुळात नरेंद्र मोदी हे त्यांच्या आईच्या कष्टाचे आणि संघर्षाचे फळ आहे. आपला मुलगा कधी तरी देशाचा पंतप्रधान होणार, हा विचारही कधी त्यांच्या आईने केला नसेल पण आईने दिलेला कानमंत्र असो की आयुष्य जगताना तिने केलेला संघर्ष असो, हाच नरेंद्र मोदींना क्षणोक्षणी प्रेरीत करत असावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.