MP Assembly Election 2023 Esakal
देश

MP Assembly Election 2023: गड कोण राखणार... ज्योतिरादित्य की दिग्विजय सिंह? भाजप अन् काँग्रेसमध्ये पराकोटीचा संघर्ष

Sandip Kapde

MP Assembly Election 2023: मध्य प्रदेशचे लक्ष लागलेल्या आणि राजघराण्यांचा गड असणारा गुना जिल्ह्यातील रणसंग्रामात अजिंक्य ठरण्यासाठी भाजप आणि काँग्रेस यांच्यात पराकोटीचा संघर्ष पाहवयास मिळू शकतो. गुना जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ राघोगड, चाचौरा, बमोरी आणि गुना यांचा समावेश आहे. त्यापैकी दोन ठिकाणी काँग्रेसचे नेते, राज्यसभेचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्या कुटुंबातील सदस्यांचा ताबा आहे आणि अन्य दोन ठिकाणी सत्ताधारी भाजपची सत्ता आहे. दिग्विजय सिंह हे राघोगड राजघराण्यातील असून हा भाग तत्कालीन ग्वाल्हेर राज्याचा भाग होता.

गुना लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर राजघराण्यातील वारसदार आहेत. गुना जिल्हा हा सिंह आणि शिंदे या दोघांसाठी राजकीय युद्धाचे मैदान राहिलेले आहे. २००२ मध्ये माजी केंद्रीय मंत्री माधवराव शिंदे यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर  त्यांचे चिरंजीव ज्योतिरादित्य शिंदे यांना गुना लोकसभा मतदारसंघतून उमेदवारी दिली. ज्येष्ठ पत्रकार रशिद किडवई यांच्या मते, माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचा राघोगड हा तत्कालीन ग्वाल्हेर साम्राज्याखाली येत होता. त्यामुळे दिग्विजय सिंह हे प्रामाणिक राहतील, असे शिंदेंना वाटत होते. (MP Assembly Election)

मात्र ते मुख्यमंत्री (१९९३-२००३) झाले, तेव्हा उभय घराण्यात राजकीय संघर्ष शिगेला पोचला. पण दुसरीकडे माधवराव शिंदे हे एका गटाचेच प्रमुख म्हणून समोर आले. गुना जिल्ह्यातील राघोगड विधानसभा मतदासंघ हा १९७७ पासून दिग्विजय सिंह कुंटुंबाकडे राहिला आहे. अपवाद १९८५ आणि २००८ . त्यावेळी त्यांचे विश्‍वासू लेप्टनंट मूल सिंह हे निवडून आले होते. दिग्विजय सिंह यांचा ३७ वर्षीय मुलगा जयवर्धन सिंह हे सध्या राघोगडचे आमदार आहेत.

तसेच काँग्रेसचे मातब्बर नेते आणि त्यांचे लहान बंधू लक्ष्मण सिंह हे सध्या गुनाच्याच चाचौरा मतदारसंघाचे आमदार आहेत. २०१३ मध्ये पहिल्यांदा राघोगड मतदारसंघातून निवडून आलेले जयवर्धन  सिंह हे २०१८ रोजीच्या  कमलनाथ सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. राजगड लोकसभा मतदारसंघातून पाच वेळेस खासदार (भाजपकडून एकदा) आणि तीन वेळेस आमदार राहिलेले लक्ष्मण सिंह यांनीही विधानसभेत राघोगडचे प्रतिनिधित्व केले. ते २००४ मध्ये भाजपमध्ये गेले आणि २०१३ मध्ये काँग्रेसमध्ये वापसी झाली.

शिंदे घराण्याशी एकनिष्ठ

गुना मतदारसंघ हा राजमाता विजयाराजे शिंदे यांच्या काळापासूनच शिंदे घराण्याशी प्रामाणिक राहिलेला आहेत. म्हणूनच जेव्हा ज्योतिरादित्य शिंदे हे २०१९ रोजी पराभूत झाले तेव्हा तो एक निर्णायक क्षण होता. या पराभवामुळे शिंदे यांचा स्वाभिमान आणि आत्मविश्‍वास ढासळला, असा दावा ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवई यांनी केला आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी या पराभवाला दिग्विजय सिंह आणि कमलनाथ यांना जबाबदार धरले होते. कमलनाथ मुख्यमंत्री असताना त्यांना राज्यसभेत स्थान देण्यासाठी देखील प्रयत्न झाला नाही, असे किडवई यांनी नमूद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT