MP Assembly Election 2023: ‘‘मध्य प्रदेशात विजय मिळवण्यासाठी भाजप तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून प्रचार करत आहे, तर काहीजण तंत्र मंत्र करत आहेत’’ असा आरोप मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी गुरुवारी केला.
उज्जैन येथे कमलनाथ यांच्या छायाचित्राभोवती काही तांत्रिक विधी सुरू असल्याची छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रसिद्ध झाली होती, त्यावरून शिवराजसिंह यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेसने मात्र शिवराजसिंह चौहान यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.
शिवराज म्हणाले की, आम्ही लोकांची मने जिंकण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ज्यांनी तंत्रमंत्रावर विश्वास नसल्याचा दावा केला होता तेच आता विजयासाठी तंत्रमंत्र करत आहेत.
दरम्यान, ‘‘ज्यांना राज्याला राजकीयदृष्ट्या स्मशानभूमी बनविले आहे त्यांनी याबाबत काही बोलू नये’’ असे प्रत्युत्तर मध्य प्रदेशचे काँग्रेस प्रवक्ते के.के. मिश्रा यांनी दिले. (MP Latest Marathi News)
तृतीयपंथीयांकडे दुर्लक्ष
मध्य प्रदेशात पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजातील विविध घटकांना आश्वासने दिली जात असताना आणि त्यांच्यासाठी विविध योजनांची घोषणा करण्यात येत असताना, कोणत्याही राजकीय पक्षाने अथवा उमेदवाराने तृतीयपंथीयांच्या समस्यांवर भाष्य केलेले नाही किंवा त्यांच्यासाठी कोणत्याही योजनांची घोषणा करण्यात येत नाही अशी खंत तृतीयपंथीयांनी व्यक्त केली आहे. तृतीयपंथी असलेल्या संध्या घेवारी म्हणाल्या, ‘‘राज्य सरकारने तृतीयपंथीयांसाठी कोणतेही विशेष धोरण अथवा योजना राबविलेली नाही.’’
विजयवर्गीय यांना इंदूरमधून उमेदवारी
मध्य प्रदेशातील इंदूर-१ मतदारसंघातून भाजपने माजी मंत्री कैलास विजयवर्गीय यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे येथील जातीय समीकरणे पाहता येथील काँग्रेसचे उमेदवार आणि विद्यमान आमदार संजय शुक्ला यांना त्यांची रणनीती बदलावी लागणार आहे. विजयवर्गीय हे वैश्य समाजातील आहेत तर शुक्ला हे ब्राह्मण समाजातील आहेत. या मतदार संघात ब्राह्मण समाजाप्रमाणेच यादव समाजाची मते देखील मोठ्याप्रमाणावर आहेत. त्यामुळेच विजयवर्गीय यांच्या विरोधात विजय मिळविण्यासाठी शुक्ला यांना आता निवडणुकीसाठी नव्याने रणनीती आखावी लागणार आहे. (Latest Marathi News)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.