MP Assembly Election 
देश

"शिंदेंच्या महालाचे चौपाटीत रूपांतर करू, जर..."; लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेत्याचा इशारा

Sandip Kapde

MP Assembly Election: मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांवर काँग्रेस नेत्यांनी हल्लाबोल केला आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर काँग्रेसने निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते राज बब्बर यांनी मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार आल्यास शिंदे यांच्या महलाचे चौपाटीमध्ये रूपांतर करणार असल्याचा इशारा दिला आहे.

ग्वाल्हेरमध्ये पत्रकार परिषदेला संबोधित करताना राज बब्बर म्हणाले , मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार आल्यास ज्योतिरादित्य शिंदे यांच्या महलाचे चौपाटीमध्ये रूपांतर केले जाईल. सर्वसामान्यांनाही महाल पाहता यावा यासाठी हे केले जाणार आहे. तिथे जाऊन फिरता येईल. (MP Assembly Election)

राज बब्बर पुढे म्हणाले, 'गरीबांनी महाल पाहिले नाहीत. काँग्रेस सरकारच्या काळात जेव्हा पर्यटनाला चालना मिळेल तेव्हा लोक महाल पाहायलाही जातील, कारण महाल फक्त जनतेचा आणि ग्वाल्हेरचा आहे. त्यामुळे जनता महालात जाऊन तिथे मनसोक्त चाट खाणार आहे. शिंदे यांनी खूप आनंद घेतला आहे, पण आता जनता मजा घेईल.

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनीही शिंदे यांच्यावर निशाणा साधला असून ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसशी गद्दारी करून भाजपमध्ये सामील होतील अशी अपेक्षाही केली नव्हती, असे ते म्हणाले. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK : Ramandeep Singh चा अविश्वसनीय झेल; पाकिस्तानी खेळाडू बघतच बसले, फलंदाजाने मारला डोक्यावर हात Video Viral

Delhi Bullet Fire: दिल्लीतील वेलकम मार्केटमध्ये जीन्स विक्रेत्यांमध्ये पैशांवरुन राडा! बंदुकीचे 17 राऊंड फायर, तरुणी जखमी

Nashik Rain: नाशिकच्या चांदवडमध्ये तुफान पाऊस! तामटीचा पाझर तलाव फुटला; नागरिकांचं स्थलांतर

IND vs PAK : दे दना दन...! तिलक वर्माच्या संघातील फलंदाजांनी पाकिस्तानची केली धुलाई

Ambernath Vidhansabha: राष्ट्रीय समाज पक्षाकडून अंबरनाथसाठी रुपेश थोरात यांच्या नावावर अखेर शिक्कमोर्तब!

SCROLL FOR NEXT